मुंबई, 16 ऑगस्ट : जवान ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी दिलेलं असतं. देशाचं संरक्षण हेच त्यांचं कर्तव्य. शत्रूचा खात्मा करणं, मातृभूमीचं रक्षण हेच त्यांचं लक्ष्य असतं. मग ऊन, पाऊस, थंडी असो वा इतर कोणतंही संकट आपलं कर्तव्य निभावण्यापासून आणि लक्ष्यापासून ते बिलकुल मागे हटत नाही. अशाच एका जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्याच्या मार्गात अचानक एक विषारी कोब्रा आला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. किंग कोब्रा साप, जगातील सर्वात खतरनाक, विषारी सापांपैकी एक. साधा साप पाहिला तरी अनेकांना घाम फुटतो. मग असा किंग कोब्रा अचानक समोर आला तर काय होईल… कल्पना करूनच तुम्हाला फक्त घाम फुटला ना… मग या जवानाच्या मार्गात अचानक असाच कोब्रा आला आणि त्यानंतर त्याने काय केलं असेल जरा विचार करा… हे वाचा - समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल आता तर तुम्ही प्रत्यक्षात पाहाच व्हिडीओत पाहू शकता एक जवान जंगलात आपल्या पोटावर झोपून सरपटत जातो आहे. आता त्याचं ट्रेनिंग सुरू आहे की तो एखाद्या मिशनवर आहे हे माहिती नाही. काही असलं तरी शत्रूचा खात्मा करायला निघालेल्या या जवानाच्या मार्गात एक भलामोठा किंग कोब्रा येतो. जवानाच्या अगदी शेजारी हा कोब्रा फणा काढून बसला आहे. जवानाकडे तो पाहतो आहे. जवानही त्या सापाकडे एकटक पाहत राहतो.
आता जवान नेमका काय करेल, हे पाहण्याची आपलीही उत्सुकता वाढते. जवान हळूच आपला एक हात त्या सापाच्या दिशेने नेतो. सापाच्या वर काही अंतरावर तो हात धरतो आणि तो हळूहळू सापाजवळ आणतो. त्यानंतर पटकन तो सापाचा फणा आपल्या हातात धरतो. सापाला आपल्या मुठीत धरून तो पुढे जातो. एका हातात बंदूक आणि एका हातात साप धरून जवान शत्रूचा सामना करण्यासाठी पुढे जातो. साप आडवा आला म्हणून तो बिलकुल मागे हटला नाही. हे वाचा - Shocking Video : मुलाने चुकून ठेवला पाय; फणा काढलेल्या कोब्र्यापासून आईने लेकाला असं वाचवलं! निरंजन महापात्रा इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला घाम फुटतो. ज्या सापाला पाहून भल्याभल्यांची हवा टाइट होते, त्या सापालाच हातात धरून जवान पुढे गेला. त्याच्या हिमतीचं कौतुक केलं जात आहे. जगातील कोणतीही ताकद, कोणताही खतरनाक प्राणी जवानाला ना घाबरवू शकत ना त्याला हरवू शकत हेच या व्हिडीओतून दिसत आहे.