मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वार्षिक फी तब्बल दीड कोटी, 'या' आहे जगातल्या सर्वात महागड्या शाळा!

वार्षिक फी तब्बल दीड कोटी, 'या' आहे जगातल्या सर्वात महागड्या शाळा!

पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. याकरिता पालक आपल्या पाल्यासाठी सर्वांत चांगल्या शाळा-महाविद्यालयाची निवड करतात.

पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. याकरिता पालक आपल्या पाल्यासाठी सर्वांत चांगल्या शाळा-महाविद्यालयाची निवड करतात.

पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. याकरिता पालक आपल्या पाल्यासाठी सर्वांत चांगल्या शाळा-महाविद्यालयाची निवड करतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

उत्तम करिअरसाठी चांगलं शिक्षण आणि कौशल्य गरजेचं असतं. सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे साहजिकच शिक्षणाचं महत्त्व वाढलं आहे. या गोष्टी लक्षात घेत पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. याकरिता पालक आपल्या पाल्यासाठी सर्वांत चांगल्या शाळा-महाविद्यालयाची निवड करतात. दर्जेदार शाळेत मुलांना प्रवेश मिळावा यासाठी प्रसंगी पालक जवळचा सर्व पैसा खर्च करण्यास तयार असतात. पण जगात अशा काही शाळा आहेत, जिथं शिक्षण घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. मात्र या शाळांची काही खास वैशिष्ट्यंदेखील आहेत.

स्वित्झर्लंडच्या लेसिन या डोंगराळ शहरात लेसिन अमेरिकन स्कूल आहे. ही जगातली एक महागडी शाळा आहे. या शाळेत 340 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेची फी 1,04,000 स्वीस फ्रॅंक म्हणजेच सुमारे 85 लाख रुपये आहे.

स्वित्झर्लंडमधील कॉलेज एल्पिन ब्यू सोलेइल स्कूल जगातली सर्वांत महागडी शाळा आहे. या शाळेत 260 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेची वार्षिक फी 1,50,000 स्वीस फ्रँक म्हणजेच सुमारे 1.23 कोटी रुपये आहे. कॉलेज एल्पिन ब्यू सोलेइलमध्ये वेगवेगळ्या 50 देशातली मुलं शिक्षण घेत आहेत. येथे विद्यार्थी- शिक्षक गुणोत्तर 4:1 असे आहे. या शाळेत फ्रेंच आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत शिक्षण दिलं जातं.

(1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk 2022 परीक्षेचा फॉर्म भरलात की नाही? उद्याची शेवटची तारीख)

ब्रिटनमधल्या सरे येथील हर्टवूड हाउस स्कूल जगातल्या महागड्या शाळांपैकी एक शाळा आहे. या शाळेत 350 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिटर्म 25284 पाउंड म्हणजेच सुमारे 22 लाख रुपये मोजावे लागतात. जे विद्यार्थी मुलाखतीत उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांच्याकडे रेफ्रन्स असतो अशाच विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश दिला जातो.

अमेरिकेतील थिंक ग्लोबल स्कूलदेखील महागडी शाळा समजली जाते. या शाळेतील शिकवण्याची पद्धत विशेष प्रसिद्ध आहे. ही शाळा एक ट्रॅव्हलिंग स्कूल आहे. अशा प्रकारे येथे शिकणाऱ्या 60 विद्यार्थ्यांना दरवर्षी चार देशांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. या शाळेची एकूण फी 94,050 डॉलर म्हणजेच सुमारे 70 लाख रुपये आहे.

(पालकांनो, मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना फसवणूक तर होत नाही ना? आधी या गोष्टी करा चेक)

स्वित्झर्लंडमधील इन्स्टिट्यूट ले या शाळेतलं शिक्षण देखील सर्वसामान्य पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. या शाळेत 420 विद्यार्थी दोन भाषांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. या शाळेत 65 पेक्षा जास्त देशांमधले विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. इन्स्टिट्यूट ले शाळेची वार्षिक फी 1,25,000 स्वीस फ्रॅंक म्हणजेच एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकूणच या शाळा दर्जेदार शिक्षण देत असल्या तरी त्यांची फी सर्वसामान्य पालकांच्या खिशावर जास्त ताण देणारी आहे.

First published:

Tags: Lokmat news