आतापर्यंत तुम्ही विचित्र पद्धतीनं तस्करी केल्याबाबत ऐकलं वा वाचलं असेल. जे लोक या काळ्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांना अनेक जुगाड करावे लागतात. असाच एक जुगाड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जलद गतीने व्हायरल होत आहे. जुगाड तंत्रज्ञानाची ही कला ज्याने कोणी पाहिली ते हैराण झाले. (Anand Mahindra was shocked to see the smuggling of liquor bottles) व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काही पोलीस अधिकारी एक पिकअप ट्रकचा तपास करीत आहे. अशात त्यापैकी एक व्यक्ती नंबर प्लेट उघडून तो भाग आपल्या दिशेने खेचतो. यादरम्यान सर्वांसमोर एक गुपित असलेलं स्टोरेज समोर येतं. ज्यात दारुच्या खूप बाटल्या अत्यंत व्यवस्थितपणे ठेवण्यात आल्याचं दिसतं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर कमेंट्स करीत आपलं मत देत आहेत.
Diabolically clever. Gives a whole new meaning to the word ‘Payload!’ But I assure you this kind of innovation was not part of the design brief for the pickup truck Product Development team at our research centre, nor will it EVER be! 😊 pic.twitter.com/JMqZN0VDAx
— anand mahindra (@anandmahindra) March 19, 2021
Looks like we have to assign tasks like this to product innovation team because necessity is the mother of invention.. pic.twitter.com/ZWFElOX2Is
— Ranjith (@ranjithyu) March 19, 2021
हा मजेदार व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी शेअर केला आणि लिहिलं की वाईट डोकं! Paylod शब्दाला नव्या उंचीवर नेलं जात आहे. या व्हिडिओला 60 हजारहून अधिक व्ह्यूज आणि तब्बल 4 हजार लाइक्स मिळाले आहेत.

)







