मराठी बातम्या /बातम्या /Viral /शिवाजी पार्कचं ते स्टिकर पाहून आनंद महिंद्रांना आठवला ‘ज्युरॅसिक पार्क’; शेअर केला फोटो

शिवाजी पार्कचं ते स्टिकर पाहून आनंद महिंद्रांना आठवला ‘ज्युरॅसिक पार्क’; शेअर केला फोटो

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना नुकताच एका गाडीवर ज्युरॅसिक पार्कच्या लोगोशी मिळताजुळता लोगो दिसला, व त्यांनी संबंधित गाडीचा फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केलाय.

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना नुकताच एका गाडीवर ज्युरॅसिक पार्कच्या लोगोशी मिळताजुळता लोगो दिसला, व त्यांनी संबंधित गाडीचा फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केलाय.

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना नुकताच एका गाडीवर ज्युरॅसिक पार्कच्या लोगोशी मिळताजुळता लोगो दिसला, व त्यांनी संबंधित गाडीचा फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केलाय.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 13 मार्च : भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल होतंय. यामध्ये त्यांनी एका गाडीचा फोटो शेअर केला असून त्या गाडीवर ज्युरॅसिक पार्कच्या लोगोशी तंतोतत जुळणारं स्टिकर लावण्यात आलंय. मात्र, या स्टिकरवर ‘ज्युरॅसिक पार्क’ ऐवजी ‘शिवाजी पार्क’ असं लिहिलं आहे.

  बाईक चालवताना तरुणीचा नको तो कारनामा; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल

  स्टीव्हन स्पीलबर्गचा 1993 चा आयकॉनिक सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन मूव्ही ‘ज्युरॅसिक पार्क’ तुम्हाला आठवतो का? या चित्रपटाचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर महाकाय डायनासोरचं दृश्य उभं राहतं. या डायनासोरमुळेच ज्युरॅसिक पार्कचा मोठा चाहतावर्ग झाला. या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले डायनासोर, त्यांचा आवाज, हे अनेकांना भितीदायक वाटतात. मग ते टी-रेक्सचे असोत किंवा ब्रॅचिओसॉरसचे असोत किंवा वेलोसिराप्टरचे असोत, प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारे असाच हा चित्रपट आहे. जेव्हा ‘ज्युरॅसिक पार्क’बद्दल चर्चा केली जाते, तेव्हा पार्कचा आयकॉनिक लोगो ही नक्कीच चर्चेमध्ये येतो. या लोगोमध्ये लाल बॅकग्राउंडवर डायनासोरची कवटी आहे. हा लोगो इतका प्रभावी होता की, तो आजही कुठे दिसला तरी सहज लक्षात येतो. या लोगोशिवाय 'ज्युरॅसिक पार्क' हा शब्द लिहिताना वापरलेला फॉन्टही तितकाच प्रसिद्ध झालाय.

  भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांना नुकताच एका गाडीवर ज्युरॅसिक पार्कच्या लोगोशी मिळताजुळता लोगो दिसला, व त्यांनी संबंधित गाडीचा फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केलाय. महिंद्रा यांनी मुंबईच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीचा फोटो शेअर केलाय. या गाडीच्या पुढील बाजूच्या दारावर एक स्टिकर लावलं आहे. या स्टिकरवरील लोगो हा पहिल्या नजरेत ज्युरॅसिक पार्क लोगोशी तंतोतंत साम्य असल्याचं दिसतं. पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर स्टिकरवर मात्र ‘ज्युरॅसिक पार्क’ ऐवजी ‘शिवाजी पार्क’ असं लिहिल्याचं दिसते. मात्र, महिंद्रांनी केलेलं हे ट्विट त्यांच्या प्रत्येक ट्विटप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.

  महिंद्रा यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात कमेंटसुद्धा येत आहेत. बऱ्याच यूजर्सना ही पोस्ट खूप आवडली असून, त्यांनी ती लाईकसुद्धा केली आहे. तर, काहींनी त्यावर मजेशीर कमेंट दिल्यात. एका यूजरनं कमेंट दिली आहे की, ‘हे खूप छान आहे!; तर, एका यूजरनं फक्त "हाहाहा" अशी कमेंट केलीय.

  दरम्यान, आनंद महिंद्रा यांचे ट्विटर अकाउंट हे प्रेरक क्लिप आणि जाणकार पोस्ट्सचा खजिना आहे. ते नेहमीच ट्विटच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या नजरेत येतील असे व्हिडिओ, फोटो टाकत असतात. त्यामुळेच त्यांचे ट्विट खूप चर्चेत असतात.

  First published:
  top videos

   Tags: Shivaji park, Viral post