नवी दिल्ली, 5 मार्च : आजकाल पाळीव प्राण्यांना पाळण्याशिवाय अनेकजण जंगली प्राण्यांनाही पाळताना दिसतात. जंगली प्राण्यांना पाहणंही काहींसाठी भयावह असतं तर काही प्राणी कधी हल्ला करतील याचा काही नेम नसतो. सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एक सर्कसमधील सिंहासाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सर्कसचा सिंह या ट्रेनरच्या सततच्या रागामुळे चिडतो आणि नंतर त्याच्यावर हल्ला देखील करतो. व्हायरल व्हिडिओ @ViciousVideos ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला आहे, ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
एका सर्कस शोदरम्यान चार सिंह त्यांच्या ट्रेनरसोबत दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सर्कस सुरु आहे आणि ट्रेनर सिंहाना शिकवल्याप्रमाणे कसरत करायला लावत आहे. मात्र यादरम्यान एक सिंह ट्रेनरने शिकवल्याप्रमाणे वागत नाही. तो ट्रेनरवरच हल्ला करतो. ट्रेनर आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंह अजिबात ट्रेनरचं एकत नाही. तेवढ्यात तिथे बाकीचे लोकही येतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, ट्रेनर संतप्त सिंहापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या आधी ट्रेनर प्रॉप्स वापरून सिंहाला जोरदार धमकावतो ज्यामुळे प्राणी चिडतो आणि हे सर्व घडतं. इतर लोक ट्रेनरला सिंहाच्या हल्ल्यापासून वाचवताना दिसतात. असे प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक भयावह हल्ल्याचे व्हिडीओ समोर आलेत.

)







