नवी दिल्ली, 12 मार्च : आजकाल भररस्त्यात प्राण्यांची, भटक्या प्राण्यांची दहशत वाढली आहे. यापूर्वी भटक्या कुत्र्यांचे तसेच पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अनेकवेळा शहरांच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या बैलांच्या हल्ल्याचे प्रकारही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आले. नुकताच असाच एक प्राण्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून अंगावर काटा येईल. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बैलाने एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना समोर आलीये. व्हिडीमध्ये दिसतंय की, चिमुकला रस्त्यावर खेळत आहे. अचानक रस्त्यातून काळ्या रंगाचा चिडलेला बैल येतो आणि थेट चिमुकल्यावर हल्ला करतो. बैलाच्या या भयानक हल्ल्यात चिमुकल्याची वाईट अवस्था होते. काहीच वेळात एक माणूस पळत येतो आणि चिमुल्याला वाचवतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील शॉक झाल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. @Riz_wank नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर कमेंटदेखील करत आहेत. बैलाचा हल्ल्याचा थरार पाहून अनेजणांना धक्का बसला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि बैलाने अशा प्रकारे एका निष्पाप मुलाला टार्गेट केल्यानंतर, यूजर्स सातत्याने भटक्या प्राण्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. त्याचवेळी या व्हिडीओची दखल घेत महापालिकेचे पथक कारवाईत आले असून, ते परिसरात फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांना जेरबंद करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.