जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Jungle Safari Video : जंगल सफारीत मग्न होते पर्यटक, तेवढ्यात वाघिणीने जे केलं ते पाहून अंगावर उभा राहील काटा

Jungle Safari Video : जंगल सफारीत मग्न होते पर्यटक, तेवढ्यात वाघिणीने जे केलं ते पाहून अंगावर उभा राहील काटा

जंगल सफारीत मग्न होते पर्यटक, तेवढ्यात वाघिणीने जे केलं ते पाहून अंगावर उभा राहील काटा

जंगल सफारीत मग्न होते पर्यटक, तेवढ्यात वाघिणीने जे केलं ते पाहून अंगावर उभा राहील काटा

अलवर जिल्ह्यातील प्रसिद्ध सरिस्का व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी वाघीण शिकार करत असतानाचा थरार अनुभवला.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अलवर, 21 मे : अनेकदा टीव्हीमध्ये तुम्ही वाघासारख्या खतरनाक प्राण्याला त्याची शिकार करताना पाहिलं असेल. परंतु हा अनुभव सरिस्का व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी याची देही याची डोळा घेतला. सध्या याघटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून तुमच्या अंगावर देखील काटा येईल. अलवर जिल्ह्यातील प्रसिद्ध सरिस्का व्याघ्र प्रकल्पात संबंधित घटना घडली आहे. पर्यटकांची जीप ही सरिस्का व्याघ्र प्रकल्पाची राणी समजल्या जाणाऱ्या ST-9 या वाघिणीच्या परिसरातून जात होती. त्यावेळी पर्यटकांच्या जीपचा पाठलाग करत एक कुत्रा त्याठिकाणी पोहोचला. कुत्रा पर्यटकांच्या जीपमागे फिरत असताना अचानक ST-9 या वाघिणीने झुडपातून त्या कुत्र्यावर हल्ला केला. वाघिणीने हल्ला करताच कुत्रा जीव मुठीत घेऊन पळत सुटला. वाघिणीने केलेला अचानक केलेला हल्ला पाहून पर्यटक ही काहीकाळ थबकले. पर्यटकांची जीप जंगलातून जात असताना त्याच्या पाठीमागे फिरणाऱ्या कुत्र्यावर वाघिणीचे लक्ष गेले होते. झाडाझुडपांच्या मागे बसलेली वाघिणीने कोणाला  काही कळण्याच्या आताच कुत्र्यावर हल्ला केला. पण कुत्रा वाऱ्याच्या वेगाने जंगलात पळून गेल्यामुळे वाघिणीचा हा हल्ला अयशस्वी ठरला. अखेर वाघीण पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात