नवी दिल्ली, 12 जुलै : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कोरोना लस दिली जात आहे. देशातील बऱ्याच लोकांनी कोरोना लस घेतली आहे. बहुतेकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत (Corona vaccination in India). आता कोरोना लस घेणाऱ्यांना मोदी सरकारकडून पैसे मिळणार असल्याचा दावा केला जातो आहे. ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना केंद्र सरकारमार्फत 5000 रुपये दिले जाणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Modi Government give money for Corona vaccination).
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे की, ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांना फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर सरकार तुम्हाला 5000 रुपये देईल. प्रधानमंत्री जनकल्याण विभागामार्फत हे पैसे दिले जातील. व्हायरल होणारा हा मेसेज किती खरा आहे, खरंच लसीकरण करणाऱ्यांना सरकारकडून पैसे मिळणार का? याबाबत पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे.
एक वायरल मैसेज में दावा किया जा रहा है कि जिन लोगों ने कोविड वैक्सीन लगवा ली है उन्हें एक ऑनलाइन फॉर्म भरने के बाद प्रधानमंत्री जन कल्याण विभाग द्वारा ₹5,000 प्रदान किए जा रहे हैं #PIBFactcheck:
▶️ इस मैसेज का दावा फर्जी है ▶️ कृपया इस फर्जी मैसेज को फॉरवर्ड न करें pic.twitter.com/AV8asQzexu — PIB Fact Check (@PIBFactCheck) July 12, 2022
पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज खोटा आहे. या मेसेजमध्ये काहीच तथ्य नाही आहे.
हे वाचा - शंका असल्यास जीभ नीट पाहा; हृदयविकाराची लक्षणंही जीभेच्या रंगावरून ओळखता येतात
कोरोना लसीकरण सुरू झालं तेव्हा त्याच्या जनजागृतीसाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी स्थानिक प्रशासनानकडून बऱ्याच ऑफर्स देण्यात आल्या होत्या. पण आता या परिस्थितीचा फायदा सायबर गुन्हेगारही घेत आहेत. कोरोना लशीच्या नावाने असे खोटे मेसेजे पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही असे बरेच मेसेज व्हायरल झाले होते. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज आले तर बिलकुल भुलू नका.
हे वाचा - कोरोनापाठोपाठ पुण्यातील Serum Institute च्या Cervical cancer vaccine ला मंजुरी; पहिलीच भारतीय लस
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून सावध राहा. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसंच हा मेसेज फॉरवर्ड न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Viral, Viral news, Viral post