नवी दिल्ली, 27 जून : आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसविषयी चिंतेत असतो. स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या गोष्टी करताना दिसतात. कोणी व्यायाम करतं तर कोणी जीममध्ये जातं. अनेकजण हेल्दी खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. लोकांचे व्यायामाचे, जीम करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. यामध्ये कधी तर काहींचे स्टंट व्हिडीओही समोर येतात. नुकताच एक स्टंट व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण जीममध्येच स्टंट करत आहे. मात्र हा स्टंट शेवटी त्याला महागात पडतो आणि त्याच्यासोबत नको ते घडतं. अनेकवेळा जिममधील लोकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडताना दिसतात. तुम्ही जिमशी संबंधित अनेक भयानक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये लोक त्यांचे कौशल्य आणि ताकद दाखवताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणीला जिममध्ये स्टंट दाखवणं महागात पडलंय.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण धावत येत उडी मारून जीममधील उपकरणाला लटकण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो गडबडीत स्टंट करायला जातो आणि त्याचा तोल बिघडतो. तरुण अतिशय वाईटरित्या डोक्यावर आणि तोंडावर कोसळतो. व्हिडीओ पाहूनच व्यक्तीला खूप दुखापत झाली असेल याचा अंदाज लावू शकतो. स्टंट करणं तरुणाला खूपच महागात पडल्याचं दिसतंय.
— 1000 WAYS TO DIE (@1000wayztodie) April 12, 2023
@ExtremeFaiIs नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत. दरम्यान, लोक फक्त काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज आहेत जे तुम्हाला थक्क करतील. लोक प्रसिद्धीसाठी आपला जीव धोक्यात टाकतात.