नवी दिल्ली, 18 जुलै : जगभरातील लोकांना वेगवेगळा छंद असतो. हे छंद फॉलो करत लोकांनी विविध रेकॉर्डही आपल्या नावे केले आहेत. आत्तापर्यंत अनेक मजेशीर, विचित्र, भयानक रेकॉर्डविषयी तुम्ही ऐकलं असेल. मात्र कधी मिरची खाण्याचा रेकॉर्ड कधी ऐकलाय का? एका व्यक्तीनं चक्क जगातील सर्वात तिखट मिर्ची खाण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. एका व्यक्तीने जगातील सर्वात तिखट मिरची खाण्याचा रेकॉर्ड केला आहे. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे. व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जगातील तिखट मिर्ची खाणाऱ्या व्यक्तीचं नाव ग्रेगरी फॉस्टर असून ते कॅलिफोर्नियाचे रहिवासी आहेत. ग्रेगरी यांनी अवघ्या 33. 15 सेकंदात जगातील सर्वात तिखट मिर्ची कॅरोलिना रीपर्स खाल्ली. त्यांनी एक मिरची नव्हे तर 33 सेकंदात चक्क 10 मिरची खाण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. ही मिरची एवढी तिखट असते की एका मिरचीमध्ये शेकडो लोकांचं जेवन बनेल. त्यामुळे ही मिरची खाणं तर सोडा जिभेवर ठेवणंही अवघड असतं. 2017 पासून कॅरोलिना रीपर्स ही जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि आता ही मिरची खाऊन ग्रेगरीनं सर्वांनाच थक्क केलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ग्रेगरीने सर्वात कमी वेळेत सर्वाधिक कॅरोलिना रीपर मिरची खातो. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. मिरचीच्या चवीविषयी सांगताना ग्रेगर म्हणाले, कॅरोलिना रीपर मिरचीची चव एखाद्या फळासारखी असते. ते सुरुवातीला गोड असते आणि नंतर लगेच वितळलेल्या लाव्हासारखे वाटू लागते. खरं तर ते काही द्रव लावासारखे आहे आणि ते वेदनादायक देखील आहे.
Which competitor can handle the heat of this Carolina Reaper chilli challenge 🥵️ pic.twitter.com/TDxsLVhLxX
— Guinness World Records (@GWR) July 16, 2023
ग्रेगरीनं सांगितलं की तो लहान लहान तिखट मिरच्या खाऊन सराव करतो. याशिवाय तो लोकांनी प्रशिक्षणही देतो. ग्रेगरीच्या मालकीची हॉट सॉस कंपनी असून तो त्याच्या शेतात मिरचीची लागवड करतो.