नवी दिल्ली, 26 मे : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येतात. प्राण्यांचे विविध व्हिडीओ पहायला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. मग ते मजेशीर व्हिडीओत किंवा, हल्ल्यांचे व्हिडीओ ते कायमच इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. नुकताच एक माकडाचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये त्याचा मजेशीर कारनामा पहायला मिळतोय. तुम्ही पर्यटन स्थळी जाता तेव्हा तुम्हाला माकडे हमखास पहायला मिळतात. दुरुन गोंडस वाटणारी ही माकडे प्रत्यक्षात खूपच खोडकर असतात. फिरायला गेल्यावर अनेकदा ही माकडे पर्यटकांना त्रास देतात. त्यांची खोड काढतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही माकड पर्यटकाला त्रास देताना दिसून आलं.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पर्यटक पायऱ्या चढत आहे. तेवढ्यात तिथे माकड येतं आणि त्या व्यक्तीचा चष्मा काढून घेतं. स्वतः तो चष्मा घालायला लागतो. तेवढ्यात एक महिला येते आणि त्याला खायला देते. खाण्याच्या नादात तो चष्मा खाली ठेवतो मग महिला तो चष्मा परत घेते. माकडाचा हा खोडकर अंदाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
@buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 19 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. आत्तापर्यंत व्हिडीओ लाखांमध्ये लाईक्स आले असून मिलियनमध्ये व्ह्युज आले आहेत. दरम्यान, यापूर्वीही माकडाच्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. माकडे कधी काय करतील काही सांगता येत नाही. कधी ते खाऊ चोरून नेतात, कधी वस्तू चोरतात, कधी हल्ला करतात, असे त्यांचे निरनिराळे रुप आणि व्हिडीओ समोर येत राहतात.