नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : आजकाल मनोरंजनासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत. यातीलच एक मनोरंजनाचा खास पर्याय म्हणजे चित्रपट. आपण सर्वजणच चित्रपट पाहतो. चित्रपटाने सर्वांनाच वेड लावलं आहे. सर्वांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट पाहिले असतील. मात्र खूप कमी जणांच्या पाहिलेल्या चित्रपटांची नाव लक्षात असतील. कदाचीत लक्षातही नसतील. मात्र एका व्यक्तीने आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांची नाव जपून ठेवली आहेत. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. एका व्यक्तीने नुकतीच आपल्या आजोबांच्या डायरीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक चित्रपटाचा रेकॉर्ड ठेवला आहे. कोणता चित्रपट कधी आणि कुठे पाहिला, सगळं लिहून ठेवलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Long long ago, my grandfather has created his own version of Letterboxd to keep record of the movies he had watched. I’m awestruck by the fact that he’s watched Hitchcock and James Bond films in theatres. pic.twitter.com/uiVhk7RqOY
— Agent Jimikki (@jimikkijackson) February 25, 2023
ट्विटरवर डायरी शेअर करताना @iamakshi_06 वापरकर्त्याने लिहिले की, “खूप वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी स्वतःचा लेटरबॉक्स बनवला होता. यामध्ये ते पाहिलेल्या चित्रपटांची नोंद ठेवत असे. त्यांनी हिचकॉक आणि जेम्स बाँडचे चित्रपट थिएटरमध्ये पाहिले याचे मला आश्चर्य वाटते. ती एक आवड आहे. अर्थात, अंबे वा (1966) कम सप्टेंबर (1961) पासून प्रेरित होता आणि माझ्या आजोबांनी दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये पाहिले होते. नंतर त्यांनी सांगितले की, आजोबांनी 1958 ते 1974 या काळात चित्रपटांवर लक्ष ठेवले आणि शेवटच्या पानापर्यंत 40 चित्रपट लिहिले.
दरम्यान, ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अगदी काही वेळात हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आले. या पोस्टवर खूप कमेंट आणि लाईक्सदेखील येत आहेत.