नवी दिल्ली, 3 एप्रिल : कर्मचारी दिवसभरात 8 ते 9 तासांचं काम कंपनीसाठी करत असतो. दिवसभर बसून कंटाळून अनेकजण काहीवेळासाठी ब्रेक घेत असतात. चहा, कॉफी, जेवणासाठी कर्मचारी ब्रेक घेतात. मात्र अशाही घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोक कोणत्याही कारणासाठी ब्रेक घेताना दिसतात. यामुळे त्यांना कंपनीकडून कधी कधी शिक्षा, भुरदंडही मिळतो. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये व्यक्तीने फक्त सिगारेट ओढण्यासाठीच खूप ब्रेक घेतले. यासाठी व्यक्तीला मोठी किंमत भरावी लागली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. जपानच्या ओसाका शहरातील एका 61 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने धुम्रपान करण्यासाठी इतके ब्रेक घेतले की त्याला 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अहवालात दावा करण्यात आला आहे की या व्यक्तीने 14 वर्षात कामाच्या दरम्यान सुट्टा पिण्यासाठी 4,000 पेक्षा जास्त ब्रेक घेतला. समजा त्याने कामाचे 355 तास 19 मिनिटे धूम्रपानासाठी वाया घालवले. विशेष म्हणजे ओसाका येथील सरकारी कार्यालयांमध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे. हेही वाचा - रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी गैरवर्तन करताच तरुणीने धू धू धूतलं, घटनेचा Video आला समोर ऑडिटिटी सेंट्रल’च्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये काही कर्मचारी शांतपणे सिगारेट ओढताना आढळले, तेव्हा पर्यवेक्षकांनी त्यांना इशाराही दिला होता. पण व्यक्तीने धूम्रपान चालूच ठेवले. अहवालात म्हटले आहे की ओसाका प्रीफेक्चरल सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या 61 वर्षीय व्यक्तीने स्थानिक सार्वजनिक सेवा कायद्यांतर्गत ‘ड्युटी ऑफ डिव्होशन’चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला शिस्तबद्ध वेतन कपातीव्यतिरिक्त त्याच्या पगारातील 1.44 दशलक्ष रुपये परत देण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचा असा काही प्रकार समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. मात्र या व्यक्तीने हद्दच केली असून याची किंमचही त्याला द्यावी लागली. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.