जाहिरात
मराठी बातम्या / Viral / उंदराला वैतागलेल्या व्यक्तीनं केलं असं काही की...,अख्खी टोळी पळाली, पाहा VIDEO

उंदराला वैतागलेल्या व्यक्तीनं केलं असं काही की...,अख्खी टोळी पळाली, पाहा VIDEO

व्हायरल

व्हायरल

घर आपण नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीही घरामध्ये पाल, मुंग्या, झुरळ, उंदीर कधी कधी पहायला मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जानेवारी : घर आपण नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरीही घरामध्ये पाल, मुंग्या, झुरळ, उंदीर कधी कधी पहायला मिळतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. असाच एक व्यक्ती उंदरांना कंटाळला होता. उंदरांना पळवून लावण्यासाठी त्याने एक भन्नाट शक्कल लढवली असून त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर उंदरांना पळवून लावण्याची आयडिया सांगणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या प्रँक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती उंदरांना पळवण्याचा अनोखा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर सर्व उंदीर एकामागून एक पळून जातात. व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उंदीर प्रादुर्भाव झालेल्या भागाला बोर्डाने झाकून त्यात छिद्र केल्याचे दाखवण्यात आले आहे. या छिद्रातून ही व्यक्ती आत कोब्रा साप सोडते. त्यानंतर सर्व उंदीर शेपटी पळताना दिसतात.

जाहिरात

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की सर्व उंदीर कसे एक एक करून बाहेर पडत आहेत आणि ही व्यक्ती त्यांना बादलीत भरत आहे. तसे पाहिले तर, प्रत्येकासाठी हे करणे शक्य नाही. साप पकडणे सोडा, सापाच्या नावानेच लोक घाबरतात. अशा परिस्थितीत हा उपाय प्रत्येकासाठी उपयुक्त ठरत नाही. मात्र, व्हिडीओमध्ये उंदीर पळताना पाहण्यात यूजर्सना मजा येते. बहुतेक वापरकर्त्यांनी जुगाडचे कौतुक केले आहे, तर काही वापरकर्ते आहेत ज्यांना ही युक्ती पूर्णपणे निरुपयोगी वाटली आहे. हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे जुगाड सांगत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधत असतात. अशा व्हिडीओंना नेटकरी चांगली पसंती दर्शवतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात