नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडत नाही. मुलांच्या संगोपनासाठी ती कठोर परिश्रम घेत असते. मुलांचं जीवन सुखमय व्हावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एक आई आणि तिच्या मुलीचा हृदस्पर्शी व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येकाचे डोळे पाणावतील. या व्हिडिओत एक अंध महिला तिच्या रडणाऱ्या आणि भुकेल्या लहान मुलीला मीठ आणि तेल लावून चपाती खाऊ घालताना दिसत आहे. भुकेल्या लेकराला चपाती खाऊ घालणारी अंध आई पाहून नेटकरी काहीसे भावूक होताना दिसत आहे. व्हिडिओतील हा प्रसंग नेमका काय आहे, ते जाणून घेऊया. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे. आपले आई-वडील आपलं जीवन अधिक चांगलं आणि सुखकर होण्यासाठी बरंच काही करत असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही मिळालं नाही, अशा सर्व गोष्टी ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आई आणि लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक अंध महिला तिच्या रडणाऱ्या मुलीला तेल आणि मीठ लावून चपाती खायला देत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ अत्यंत हृदयस्पर्शी आहे. @loves_xpress नावाच्या एका युजरनं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर आत्तापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच व्हिडिओला सहा दशलक्षांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओत, एक अंध आई तिच्या रडत असलेल्या मुलीला चपाती खाऊ घालताना दिसत आहे. दृष्टी नसलेली ही महिला अंदाज बांधत चपाती हातात घेते आणि तेल शोधू लागते. तेल सापडल्यानंतर ती चपातीला तेल आणि मीठ लावते. ही चपाती स्वतः न खाता, भूक लागल्याने रडत असलेल्या तिच्या मुलीला ती चपाती खाऊ घालताना दिसते. या व्हिडिओतली ही अंध महिला आपल्या मुलीसाठी जे प्रयत्न करते ते पाहून प्रत्येकजण क्षणभर भावूक होऊन जातो. खरं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरील आजपर्यंतचा सर्वांत सुंदर आणि अनोखा व्हिडिओ मानला जात आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. `आई ही आई असते, ` असं एक इन्स्टाग्राम युजर कमेंट करताना लिहितो. दुसरा एक युजर ``देव तिला आणि तिच्या मुलीला आशीर्वाद देवो,``अशी कमेंट करतो. ``कितीही त्रास होत असला तरी आई आपल्या मुलीसाठी काहीही करण्यास तयार असते, `` असं तिसऱ्या एका युजरनं कमेंटमध्ये म्हटलं आहे. ``मी हा व्हिडिओ सेव्ह करत आहे आणि कधीतरी या व्हिडिओचा आनंद घेईल, ``असं एका युजरनं कमेंटमध्ये म्हटले आहे. एकूणच अंध महिला आणि तिच्या मुलीचा हा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.