हरिद्वार, 28 जून : काहीतरी तुफानी करण्याचा जोश, स्टंट करणं म्हटलं हे तरुणच समोर येतात. पण एका वृद्ध महिलेने सर्वांनाच धक्का दिला आहे. एका आजीबाईमध्ये तुफानी जोश चढला आणि तिने थेट उंच पुलावरील गंगा नदीत उडी मारली. भयानक स्टंट करणाऱ्या या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (70 Year old woman jumps in ganga river).
उत्तराखंडच्या हरिद्वारमधील हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हरकी पैडीत एका वृद्ध महिलेने पुलावरून गंगा नदीत उडी मारली. पुलाच्या रेलिंगवर जात न घाबरता तिने नदीत उडी घेतली, त्यानंतर ती पोहोताना दिसली. या महिलेचं वय 70 वर्षे असून ती हरयाणाच्या जींदमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.
हे वाचा - बापरे! गाईला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सिंहाशीही भिडला तरुण, धक्कादायक शेवट; पाहा VIDEO
मीडिया रिपोर्टनुसार ही महिला गंगा नदीत स्नान करायला आली होती. तेव्हा तिने काही तरुणांना पुलावरून गंगा नदीत उडी मारताना पाहिलं. तेव्हा तिच्यातही तरुणांसारखा जोश आला. जोशात ती पुलावर तरुणांजवळ पोहोचली आणि तिनेही त्या पुलावरून गंगा नदीत उडी मारली.
The video of an elderly woman jumping into the Ganga river from the bridge of Harki Paidi is getting viral on social media. The elderly woman is seen jumping from the bridge into the Ganga and swimming comfortably. Her age is said to be around 70 years.#haridwar pic.twitter.com/6crkQhqPUe
— Kunal 🖤 (@Kunalistic) June 28, 2022
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganga river, Uttarakhand, Viral, Viral videos