लंडन, 12 डिसेंबर : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका ठिकाणाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यात एका मिनिटात 5 लक्झरी गाड्या गायब करण्यात आल्या आहेत. 7 कोटींच्या या गाड्या. हे सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
आता एका मिनिटात पाच गाड्या गायब हे कसं शक्य झालं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका गेटजवळ एक व्यक्ती दिसते आहे. मास्क घातलेली ही व्यक्ती. जिने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलं आहे. तिचा चेहरा दिसत नाही आहे. ही व्यक्ती गेट उघडते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने आणखी एक दुसरी व्यक्ती धावत येते आणि ती गेट धरते तर गेट उघडणारी व्यक्ती तिथं जवळ असलेल्या एका कारमध्ये जाऊन बसते. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच कार गेटमधून बाहेर पडत वेगाने निघून जातात. त्यानंतर गेट पकडलेली व्यक्तीही तिथून पळून जाते.
हे वाचा - iPhone चोरायला आला होता, पण..; तरुणीचं ते एक वाक्य ऐकताच चोराने ठोकली धूम
अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. जो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. चोरट्यांनी कारची केलेली ही चोरी.माहितीनुसार या गाड्यांची एकूण किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे.पोर्श, मर्सिडीज अशा गाड्यांचा यात समावेश आहे.
एसेक्स पोलिसांनी @EssexPoliceUK या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बुल्फानमधील ब्रेंटवूड रोडवर 11 नोव्हेंबरला घडलेली ही चोरीची घटना. पलीस याचा तपास करत आहेत.
We are currently investigating an incident where multiple luxury cars were stolen from a unit on Brentwood Road in #Bulphan on 11 November.
Did you witness anything suspicious? If so, please contact us. pic.twitter.com/2huktS0PJI — Essex Police (@EssexPoliceUK) December 5, 2022
तुम्हाला काही संशयास्पद वाटत असेल तर त्याची माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Robbery, Thief, Viral, Viral videos