मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी

बापरे! एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी

एका वाईट सवयीमुळे महिलेची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी दिसू लागली.

एका वाईट सवयीमुळे महिलेची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी दिसू लागली.

एका वाईट सवयीमुळे महिलेची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी दिसू लागली.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 31 मे : आपल्या सवयींचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतात. काही सवयी इतक्या वाईट असतात की त्याचे गंभीर दुष्परिणा होतात. फोटोत दिसणाऱ्या या महिलेलाही तिची अशीच एक वाईट सवय भारी पडली आहे. ही तरुणी फक्त 30 वर्षांची आहे. पण तरुण वयातच ती 80 वर्षांची म्हातारी दिसू लागली आहे. तिच्या एका वाईट सवयीमुळे तिची इतकी भयावह अवस्था झाली की तरुणपणातच ती म्हातारी झाली आहे (31 Year old woman look like 80 years old ). यूएसच्या टेनेसीत राहणारी एशले बटलर. जिचं वय फक्त 31 वर्षे आहे. पण तिला पाहून ती तरुण नाही तर म्हातारी दिसते आणि याचं कारण म्हणजे तिला जडलेलं एक व्यसन. तिला ड्रग्ज व्यसन आहे. या व्यसनामुळे तिचे सर्व दात पडले. एशले सांगते, तिला घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती. ज्यानंतर डिप्रेशनमुळे तिला ड्रग्जचं व्यसन जडलं. त्याचा परिणाम थेट तिच्या दातांवर झाला. तिच्या दातांवरील इन्फेक्शनव वाढलं आणि ते खराब होऊ लागले. दात पडल्याने तिचा चेहरा वृद्ध महिलेसारखा दिसू लागला. आता ती नकली दात लावते आणि मेकअप करते, ज्यामुळे ती तिच्या वयाला साजेशी तरुण दिसू लागते. आपल्या या दोन्ही लूकचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा लूक पाहून नेटिझन्स तिला कॅटफिश म्हणू लागले. पण तिने याला विरोध केला आहे. हे वाचा - PHOTO - डिस्काऊंटच्या नादात दातांवर उपचारासाठी परदेशात गेली; तोंड उघडताच हादरली महिला कॅटफिश म्हणजे वेगवेगळी रूपं घेऊन लोकांना इम्प्रेस करणं. पण आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या समाधानासाठी डेंजर लावत असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. आपण जसे दिसतो, त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आपल्या दोन्ही लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान ड्रग्जच्या व्यसनामुळे अशी अवस्था झालेली ही एशले एकटी नाही. याआधीही असंच एक प्रकरण समोर आलं होतं.  मिसौरीतील 22 वर्षांची  मिसौरीच्या फेथ हिलने (Faith Hill) सहा वर्षे मेथच्या व्यसनाधीनतेमध्ये घालवली. अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानं तिचं वजन कमी झालं, तिला आपले दातही गमवावे लागले. आपला वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर करत तिने लोकांना आपले दात व्यवस्थित ठेवण्यासाठी हे व्यसन सोडण्याचं आवाहन केलं. हे वाचा - मोतीबिंदूसाठी देशव्यापी मोहीम; दीड कोटी लोकांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे मोदी सरकारचे नियोजन अमेरिकन डेन्टल असोसिएशनच्या मते, नशा करणारे अनेक लोक हिरड्यांचे आजार आणि हिरड्या किंवा दात खराब होणे अशा समस्यांचा सामना करतात. अनेकदा हे दात काढून टाकावे लागतात.
First published:

Tags: Lifestyle, Viral, Viral photo

पुढील बातम्या