जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली 'पापा की परी'; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL

चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली 'पापा की परी'; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL

चालत्या कारच्या खिडकीतून उडू लागली 'पापा की परी'; शालेय विद्यार्थीनीचा जीवघेणा स्टंट VIDEO VIRAL

चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर येत जीवघेणा स्टंट करणाऱ्या शालेय मुली कॅमेऱ्यात कैद.

  • -MIN READ
  • Last Updated :

क्वालालांपूर, 26 मार्च : वडिलांच्या लाडक्या असलेल्या मुलींना प्रेमाने पापा की परी म्हटलं जातं. पण या पापा की परी आता खरोखरच स्वतःला परी समजू लागल्या की काय असा प्रश्न पडला आहे तो एका व्हायरल व्हिडीओमुळे. या व्हिडीओत शाळेत जाणाऱ्या मुली कारच्या खिडकीतून बिनधास्तपणे उडताना दिसल्या आहेत. स्कूल युनिफॉर्ममध्ये शालेय विद्यार्थीनीचा हा जीवघेणा स्टंट समोर आला आहे (School girls stunt in car). चालत्या गाडीतून हात, डोकं बाहेर काढू नये, असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. असं असताना एका कारच्या खिडकीत उभं राहून शाळेच्या मुली खरतनाक स्टंट करताना दिसल्या. फेसबुकवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. हे वाचा -  चक्क उंदराला पाहून वाघाची मावशीही झाली भीगी बिल्ली; का घाबरलं मांजर पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक कार रस्त्यावर धावते आहे. या कारमध्ये काही शालेय विद्यार्थी आहेत. दोन खिडक्यांमधून दोन मुली बाहेर आलेल्या दिसत आहेत. त्यांचं निम्मं शरीर गाडीच्या बाहेरच आहे. व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण या मुली बिनधास्त मजा लुटताना दिसत आहेत.

एक मुलगी काही वेळाने गाडीत पुन्हा जाते तर एक मुलगी मात्र तशील लटकत राहते. किंबहुना ती आपले दोन्ही हात पक्ष्याच्या पंखासारखे हलवत उडण्याचा आनंद घेताना दिसते. हे वाचा -  हा तर देशी स्पायडरमॅन! तरुणाचं टॅलेंट पाहून नेटिझन्स थक्क; पाहा VIRAL VIDEO या मुलांनी आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात टाकला आहे. त्यांची छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतू शकली असती. माहितीनुसार हा व्हिडीओ मलेशियाच्या इपोहमधील आहे. ताम्बुनमध्ये कॅल्टेक्स पेट्रोल पंपजवळ हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात