जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 26 लग्न, 22 घटस्फोट आणि टार्गेट 100 लग्नांचं, व्यक्तीचा विचित्र छंद, पाहा Video

26 लग्न, 22 घटस्फोट आणि टार्गेट 100 लग्नांचं, व्यक्तीचा विचित्र छंद, पाहा Video

व्हायरल

व्हायरल

आजकाल तर लग्नामध्ये अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा प्रकारे लग्नांमध्ये फसवणूक होत असते. अनेक लोक एकहून अधिक लग्नदेखील करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : लग्न, परंपरा आणि लग्नाचे निराळे समारंभ यांना भारतात खूप महत्त्व आहे. त्यामुळे लग्नासाठी, लग्न शानदार व्हावं यासाठी खूप मेहनत घेतात. लग्नामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा वेगळे विधी असतात. आजकाल तर लग्नामध्ये अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा प्रकारे लग्नांमध्ये फसवणूक होत असते. अनेक लोक एकहून अधिक लग्नदेखील करतात. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये व्यक्तीने 26 लग्न केली असून 22 घटस्फोट झाले आहेत. आणि त्याचं टार्गेट 100 लग्न करण्याचं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊ. 26 लग्नामुळे चर्चेत आलेल्या या व्यक्तीचा एक व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. एका पाकिस्तानी यूट्यूबरने त्यांची मुलाखत घेतली आणि त्यातून त्याच्या लग्नाची गोष्ट समोर आली. ज्योतच्या ज्योत जीत नावाच्या युजरने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती आपल्या तरुण पत्नींसोबत बसला आहे. यावेळी त्यांच्या एकूण 4 बायका दिसत आहेत.

जाहिरात

मुलाला जन्म दिल्यानंतर तो बायकोला सोडून देतो. त्याने ही गोष्ट आधीच बायकांच्या पालकांना सांगितली आहे. तो फक्त घटस्फोट देण्यासाठी लग्न करतो आणि मुलीही त्या माणसाशी लग्न करायला तयार होतात. त्यांनी आतापर्यंत 26 विवाह केले असून त्यापैकी 22 जणांसोबत घटस्फोट झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या व्यक्तीचे म्हणणे आहे की 100 लग्नानंतर 100 घटस्फोट देण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. इतकेच नाही तर त्याची एकूण 22 मुले आहेत, जी त्यांच्या आईसोबत राहतात. घटस्फोटानंतर पत्नीला राहण्यासाठी त्याने घर आणि खर्चही दिला असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर विवाह करणे आणि घटस्फोट घेणे हा त्यांचा छंद आहे. यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांचे मत आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याचे नाव काय आणि पाकिस्तानचे कोणते शहर आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. लोक या व्यक्तीला ट्रोल करत आहेत. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे लोक संताप व्यक्त करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात