मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजब प्रेमाची गजब कहाणी! चक्क प्लेनसोबत रिलेशनशिप; विमानाशीच लग्नही करतेय ही तरुणी

अजब प्रेमाची गजब कहाणी! चक्क प्लेनसोबत रिलेशनशिप; विमानाशीच लग्नही करतेय ही तरुणी

फोटो सौजन्य  - MERCURY PRESS

फोटो सौजन्य - MERCURY PRESS

23 वर्षांची तरुणी विमानासोबतच खाते-पिते-झोपते. विमानच तिचं आयुष्य झालं आहे. आता तिने त्याच्याशीच लग्न करायचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Priya Lad
टोकियो, 30 मे : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कधी कुणावर जडेल आणि त्यासाठी कोण कधी काय करेल सांगू शकत नाही. अशीच एक तरुणी जी चक्क एका विमानाच्या प्रेमात पडली आहे. विमानाच्या प्रेमात ती इतकी वेडी झाली आहे की, तिने आता त्याच्याशीच लग्न करायचं ठरवलं आहे. 23 वर्षांची ही तरुणी प्लेनसोबत लग्नगाठ बांधणार आहे (Girl Marrying With Plane). जर्मनीत राहणारी 23 वर्षांची सारा रोडोला निर्जीव वस्तू खूप आवडतात. त्यापैकी तिला सर्वात जास्त आवडतं ते प्लेन. त्यातही सर्वात आवडतं प्लेन आहे ते बोइंग-737. यातूनच ती ट्रॅव्हल करते.  जसं बहुतेक लोक आपल्या जोडीदाराचं किंवा प्रिय व्यक्तीच्या नावाचा टॅटू शरीरावर काढून घेतात तसं साराने  या विमानाचं टॅटू आपल्या शरीरावर बनवून घेतला आहे. इतकंच नव्हे तर विमानासोबतच खाते-पिते, उठते-झोपते. म्हणजे तिच्याकडे बोइंग-737  खेळणं आहे, जे तिच्यासोबतच असतं. ज्याचं नाव तिने डिकी ठेवलं आहे. एकंदरच काय तर  तिचं आयुष्य म्हणजेच विमान आहे. हे वाचा - पाण्यात डान्स करण्यात इतका मग्न झाला की हातात थेट मगरच पकडली; मग काय घडलं पाहा, VIDEO सारा सांगते, आपल्याला या विमानाची प्रत्येक गोष्ट आवडते. त्याचे पंख, त्याचं इंजिन, त्याचा चेहरा सर्वकाही आवडतं. तिला याचा आवाजही इतका आवडतो की यातूनच प्रवास करते. ती विमानाच्या प्रेमात इतकी वेडी आहे की आता त्याच्याशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णयही तिने घेतला आहे. साराला अनेकांना डेट करण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणजे, तिला फक्त एअरलाइन्सशी संबंधित व्यक्तीच समजून घेऊ शकतो. तिला फक्त या विमानाशीच लग्न करायचं आहे.  मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार सारा ऑब्जेक्टम सेक्शुल पर्सनलिटी आहे. म्हणजे निर्जीव वस्तूंकडे ती सेक्शुअली आकर्षित होते. हे वाचा - अजबच! खेळण्यातील विमानाच्या प्रेमात पडलीये 28 वर्षीय तरुणी; असा करते रोमान्स सारा ही पहिली तरुणी नाही जी विमानाशी लग्न करणार आहे. याआधीही एका तरुणीने असाच निर्णय घेतला होता. बर्लिनमधील (Berlin) मिशेल कोबके (Michele Kobke) सुद्धा विमानाच्या प्रेमात पडली. 6 वर्षे ती या विमानासोबत रिलेशनशिपमध्ये होती.  बोईंग 737-800 या विमानाशी लग्न करणार असल्याचंही तिने सांहितलं होतं. मिशेलने मार्च 2014मध्ये टेगल विमानतळावर हे बोईंग विमान सर्वप्रथम पाहिले. बोईंगचे पंख, त्याच्या आकार आणि थ्रस्टर प्रचंड आवडले. तेव्हापासून ती त्याच्यावर प्रेम करत होती. मिशेलच्या मते हे तिचे Long Distance Relationship होतं. व्यवसायाने सेल्सवुमन असलेली मिशेल जेव्हा तिला वाटते, तेव्हा ती या बोईंग विमानाला पाहायला जाते. विमानाच्या पंखांचे चुंबन घेताना काही फोटोही तिने घेतले होते. . मिशेलने विमानाचे एक खेळण्याचे मॉडेलही खरेदी केलं.
First published:

Tags: Airplane, Lifestyle, Viral

पुढील बातम्या