मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक होणार गायब! Time traveller चा खळबळजनक दावा

ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक होणार गायब! Time traveller चा खळबळजनक दावा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

2022 सालात घडणाऱ्या घटनांबाबत टाइम ट्रॅव्हरने अजब दावा केला आहे.

    मुंबई, 11 मे : भविष्यात काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. बरेच लोक आपला दिवस कसा जाणार हे पाहण्यासाठी राशिभविष्य पाहतात. आपल्या आयुष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातात. जगात घडणाऱ्या अशाच भविष्यात मोठ्या घटनांबाबत आपल्याला सर्वकाही माहिती आहे, असा दावा करतात ते टाइम ट्रॅव्हलर. जे आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबत धक्कादायक खुलासे करतात. स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या अशाच एका टाइम ट्रॅव्हरलने एक खळबळजनक दावा केला आहे (Weird claim by time travellers) . ऑगस्टमध्ये अचानक 20 लाख लोक गायब होणार आहेत, असा दावा या टाइम ट्रॅव्हलरने केला आहे  (20 lakh people will vanish in August 2022). डेली स्टारच्या रिपोर्टनुसार कॉही नियोनार्ड (Kawhi Leonard) नावाच्या टिकटॉक युझरने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही व्यक्ती आपण टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करते. ज्यात त्याने भविष्याबाबत धक्कादायक दावे केले आहेत (Man claim weird future claims). 2022 साला शॉकिंग घटना घडणार असल्याचं या व्हिडीओ सांगण्यात आलं आहे. हे वाचा - 'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण... व्हिडीओत केलेल्या दाव्यानुसार 14 जुलै 2022 रोजी अमेरिकेत भयंकर भूकंप येणार आहे. तिथं धरतीचे दोन भाग होतील. त्यानंतर 9 ऑगस्टला जगातील 20 लाख लोक अचानक गायब होतील. रहस्यमयी रित्या ते गायब होतील. 3 ऑक्टोबर 2022 ला स्टॉकर्स नावाचा विचित्र प्राणी धरतीवर हल्ला करेल. हे दावे कितपत खरे ठरतील माहिती नाही. या अफवा असल्याचं म्हटलं जातं आहे. पण तरी कॉहीच्या चाहत्यांनी जगाला वाचवण्याची प्रार्थना देवाकडे केली आहे. तर काहींनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 24 मे 2022 रोजी दिसणार एलियन याआधी एका टाइम ट्रॅव्हलरने केलेल्या दाव्यानुसार 24 मे 2022 रोजी दुसर्‍या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयानक असतील. हे वाचा - भारतातलं असं ठिकाण जिथे नैसर्गिकपणे तयार झालाय देशाचा नकाशा, पाहा 2 नद्यांच्या संगमावरचा 'भारत' 2491 मध्ये जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीच्या मते, आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स (Nirons) म्हणून ओळखले जाईल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या