Home /News /viral /

Nagin Dance Video : पुंगी वाजताच 2 वृद्धांच्या अंगात संचारलं; पाहता पाहता आजोबा बनले 'नागिण'

Nagin Dance Video : पुंगी वाजताच 2 वृद्धांच्या अंगात संचारलं; पाहता पाहता आजोबा बनले 'नागिण'

दोन आजोबांचा नागिण डान्स व्हिडीओ (Old man nagin dance video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 14 मार्च : नागिन डान्स (Nagin Dance) तसा तुमच्यासाठी काही नवा नाही. लग्नाची हळद असो, लग्नाची वरात असो अशा बऱ्याच ठिकाणी तरुणांना पुंगीच्या धूनवर थिरकताना तुम्ही पाहिलं असेल. नागिन डान्स करताना पाहिलं असेल. पण आता दोन आजोबांचा नागिण डान्स व्हिडीओ (Old man nagin dance video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पुंगी वाजताच आजोबांच्या अंगात संचारलं आणि वृद्ध व्यक्ती नागिण बनले. दोन वृद्ध पुंगीच्या धूनवर थिरकले आहेत. त्यांनी असा नागिण डान्स केला आहे की पाहून तरुणांनाही लाज वाटेल. पुंगीची धून ऐकू येताच दोन्ही आजोबा स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. दोघंही मैदानात आमनेसामने आले आणि नागिन डान्स करू लागले. एक गारूडी बनला तर एक नागिण. गारूडी बनून एक आजोबा पुंगी वाजवण्याची अॅक्टिंग करत होते तर दुसरे आजोबा त्यावर नागिण बनून नागिणीसारखा डान्स करत होते.
    View this post on Instagram

    A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

    Giedde नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आजोबांचा हा भन्नाट नागिण डान्स सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - अजबच! म्हणे, 'पार्कमध्ये फिरायला गेलो आणि पायच हरवला', शोधून देणाऱ्याला बक्षीस आजोबांच्या या नागिण डान्सचं बऱ्याच नेटिझन्सनी कौतुक केलं आहे. आजोबांच्या या डान्सनी माझं मन जिकलं, व्वा काय जान्स आहे, आजोबा थोडा आराम करा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया युझर्सनी दिल्या आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dance video, Old man, Viral, Viral videos

    पुढील बातम्या