Home /News /viral /

12 व्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती महिला; मात्र बसला झटका!

12 व्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती महिला; मात्र बसला झटका!

फोटो - सोशल मीडिया

फोटो - सोशल मीडिया

मोनेट डियास असे या महिलेचे नाव आहे. तिचे वय 52 वर्ष आहे. तसेच ती अमेरिकेत राहते.

  प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न (Marriage) ही एक महत्वाची बाब आहे. प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी उत्सुक असतो. लग्न झाल्यानंतर दोन्ही जण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, एक महिला तिचे लग्न वारंवार मोडल्यामुळे परेशान झाली आहे. आतापर्यंत तिचे 11 वेळा लग्न केले आहे. मात्र, ही कोणत्याही पतीसोबत जास्त वेळ रिलेशनमध्ये नाही राहू शकली. नुकतेच तिचे होणाऱ्या पतीसोबतही ब्रेकअप झाले. त्यामुळे एकूण 12व्या वेळी तिचे लग्न (12 Times marriage broke) मोडले गेले आहे. याबाबत तिने स्वत: माहिती दिली. मोनेट डियास (Monette Dias) असे या महिलेचे नाव आहे. तिचे वय 52 वर्ष आहे. तसेच ती अमेरिकेत राहते. मोनेट या इंटेरिअर डिझायनर आहे. तसेच एका मुलाच्या आई आहेत. त्या TLC चा कार्यक्रम ‘Addicted to Marriage’ मध्येही सहभागी झालेल्या आहेत. तिथे त्यांना 12 वा पतीची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. 'डेली स्टार' ने दिलेल्या माहितीनुसार, मोनेट डियास आणि त्यांचा होणार पती जॉन यांचे नाते चांगल्या प्रकारे सुरू होते. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. मोनेट म्हणाल्या, माझे जॉनवर खूप प्रेम होते. त्यामुळे माझ्यासाठी हे ब्रेकअप करणे खूप कठीण होते. हे नाते टिकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला होता, असेही मोनेट यांनी सांगितले. तर तेच दुसरीकडे मोनेट डियास यांची बहीण मार्सी सांगते की, जेव्हा माझ्या बहिणीचे दोन किंवा तीन वेळा लग्न झाले तेव्हा मला काळजी वाटली नाही. मात्र, 11 वेळा लग्न केल्यानंतर तिची काळजी वाटते. कदाचित माझ्या बहिणीला कधीच तिच्या योग्य पती मिळणार नाही, असेही मार्सी म्हणाली. हेही वाचा - जगातील सर्वात वयोवृद्ध एअरहोस्टेसची गिनिज बुकमध्ये नोंद, या वयातही करतेय नोकरी दरम्यान, मार्सीचे लग्न झाले आहे. तसेच 38 वर्षांपासून त्या आपल्या पतीसोबत राहतात. तर 12 वेळा लग्न मोडल्यानंतरही मोनेट यांना असे वाटते की, त्यांना एकदिवस त्यांच्या योग्य जीवनसाथी नक्की मिळेल. आपली बहीण मार्सी यांच्यासोबत बोलल्यावर मोनेट यांनी होणारा पती जॉनसोबत संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र, अजूनपर्यंत त्यांच्यात बनले नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Breakup, Marriage, Woman

  पुढील बातम्या