Home /News /videsh /

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला सून हवीय; त्याच्या अटी वाचून मुली म्हणाल्या...

वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला सून हवीय; त्याच्या अटी वाचून मुली म्हणाल्या...

झाकीर नाईकने त्याची सून होणाऱ्या मुलीसाठी अनेक अटी घातल्या आहेत. याबाबत त्याने फेसबुकवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. नाईक आपल्या मुलासाठी योग्य "धार्मिक मुस्लीम मुलगी" शोधत आहे.

    क्वाललंपूर, 26 सप्टेंबर : भारतात धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप असलेला फरार मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला (zakir naik) त्याचा मुलगा फरीकचे लग्न (zakir naik is looking for virtuous muslim girl) करायचे आहे. झाकीर नाईकने त्याची सून होणाऱ्या मुलीसाठी अनेक अटी घातल्या आहेत. याबाबत त्याने फेसबुकवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. नाईक आपल्या मुलासाठी योग्य "धार्मिक मुस्लीम मुलगी" शोधत आहे. मुस्लीम मुलीचे चांगले चारित्र्य असणे ही अत्यंत महत्त्वाची अट आहे, असंही त्याने म्हटले आहे. झाकीर नाईकने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, 'मी माझ्या मुलाला फरिकसाठी पत्नी शोधत आहे. एक चांगले चारित्र्य असलेली एक धार्मिक मुस्लिम मुलगी लग्नासाठी हवी आहे, जेणेकरून माझा मुलगा आणि त्याची पत्नी एकमेकांसाठी एक शक्ती बनू शकतील. जर तुम्ही अशा मुलीचे वडील किंवा नातेवाईक असाल तर या पोस्टवर संपूर्ण माहितीसह उत्तर द्यावे. नाईक याने त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्यांविषयी माहिती शेअर केली आहे. झाकीर नाईकची सून होण्यासाठी या अटी आहेत. मलेशियात राहणाऱ्या झाकीर नाईकने आपल्या भावी सुनेसाठी काही अटीही दिल्या आहेत. त्यानुसार कुराण आणि हदीसच्या शिकवणीनुसार मुलीला इस्लामचे पालन करणे अनिवार्य आहे. मुलीने सर्व प्रकारच्या हराम कारवायांपासून दूर राहिले पाहिजे. मुलगी धार्मिक असावी आणि तिचे चारित्र्य चांगले असावे. आपली भावी सून इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करणारी असावी. विलासी जीवन टाळून सामान्य जीवन जगणारी. इंग्रजी बोलणे अनिवार्य आहे. तसेच मलेशियात राहण्याची इच्छा असावी. त्या मुलीचा कोणत्याही इस्लामिक संघटनेशी संबंध असणे आवश्यक आहे. हे वाचा - भाजप किंवा केंद्र सरकार विरोधात जो बोलेल त्याला ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे: सुप्रिया सुळे झाकीर नाईकने इच्छुक कुटुंबीयांना मुलीचा बायोडाटा पाठवण्यास सांगितलं आहे. त्यानं मुलाचा तपशील देखील पोस्ट केला आहे. परंतु, या फरार मौलवीने त्याच्या मुलगा फरिकचा फोटो मात्र पोस्टसह शेअर केला नाही. झाकीर नाईकच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. सूनेसाठी घातलेल्या इतक्या साऱ्या अटी पाहून मोठ्या संख्येने महिला झाकीर नाईकची खेचली आहे. मिली मार्टिझा नावाच्या महिलेनं लिहिलंय की, 'मला वाटते की मुली मुलांशी लग्न करतात, मात्र, त्यांना अशा माणसाशी अजिबात लग्न करायचे नाही, ज्याला पत्नी शोधण्यासाठी बापाची गरज पडत आहे. हे वाचा - भटक्या-आजारी कुत्र्यांसाठी बनवली हक्काची जागा! वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी घेतला या कामाचा वसा 'तुम्ही अशी मुलगी शोधत आहात, जी तुम्हाला जगात सापडणार नाही' उगाबद नूर सनळे यांनी लिहिले की, तुम्ही एक असी संस्कृती पसरवत आहात, ज्यातून खूप अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही अशी एक परिपूर्ण मुलगी शोधत आहात, जी या जगात मिळणारच नाही. तुम्हाला तुमचा मुलगा आनंदी राहावा असे वाटते की, तुमच्या मुलाने तुमच्या अटी आणि आवडीनुसार जगावे असे तुम्हाला वाटते? काही पालकांच्या विचित्र मानसिकतेमुळं मला आश्चर्यच वाटते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Zakir naik

    पुढील बातम्या