जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

लॉकडाऊनमुळे 2020 या वर्षात पृथ्वीचं तापमान कमी झालं असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक आहात. 1880 पासून एका वर्षात जागतिक तापमान (Global Temperature) किती होतं यांची नोंद ठेवायला सुरुवात झाली. या नोंदीनुसार 2020 हे गेल्या 140 वर्षांतलं सर्वांत उष्ण म्हणजे सर्वाधिक तापमान असलेलं वर्ष ठरलं आहे.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

जागतिक तापमानाची म्हणजे पृथ्वीच्या तापमानाची नोंद 1880 पासून ठेवली जात आहे. गेल्या 140 वर्षांत 2020 हे सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरलं आहे. संपूर्ण जगात लॉकडाउन होता त्यामुळे वाहन खूपच कमी प्रमाणात रस्त्यांवर होती. परिणामी कार्बन उत्सर्जन कमी झालं, मग तापमानही कमी व्हायला हवं होतं ना? मग तापमान का वाढलं? नासाच्या गोडार्ड इंस्टिट्यूट फॉर स्पेस स्टडिजने (Goddard Institute for Space Studies) या तापमानवाढीचं कारण सांगितलंय. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
02
News18 Lokmat

2020 मध्ये ऑस्ट्रेलिया, सायबेरिया आणि अमेरिकी वेस्ट कोस्टच्या जंगलांत तर प्रचंड मोठ्या आगी लागल्या. त्या इतक्या मोठ्या होत्या की अटलांटिक वादळ आलं तरीही ती शमली नव्हती. याचा फटका पर्यावरणासोबतच अर्थव्यवस्थेलाही बसला. पावसाचं प्रमाण कमी होणं, उष्ण वारे वाहणं यामुळे जंगलांतल्या आगींचं प्रमाण वाढायला मदत झाली. कधीकधी वणवा लागायला नैसर्गिक कारणंही असतात. जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यावर किंवा गवतावर पावसातली वीज पडली की ती पेट घेतात आणि उष्ण हवेमुळे वणवा पसरतो. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
03
News18 Lokmat

उष्ण हवामानामुळेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पाचवेळा वणवा पेटला. 1932 पासून सहा वेळा कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवे पेटले आहेत त्यापैकी पाच वणवे केवळ गेल्यावर्षीच पेटलेत. वणव्यातील राख वाऱ्याने वाहून आसमंतात भरून राहिल्याने कॅलिफोर्नियाच्या शेजारी असलेल्या सॅन फ्रान्सिस्को, ओरेगन आणि वॉशिंग्टन या राज्यांतील आसमंत धुळीनी भरून गेलं आणि नारंगी रंगाचं दिसत होतं. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
04
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियात 2019 च्या सप्टेंबरमध्ये जंगलात पेटलेला वणवा 2020 च्या पहिल्या काही महिन्यांत शांत झाला. लाखो हेक्टर परिसराला वणव्याचा फटका बसला. अग्निशमन दलाच्या लोकांसह 30 जणांचा बळी या वणव्यानी घेतला. त्याचबरोबर 63 लाख हेक्टरवरचं जंगल आणि पार्क आगीत भस्मसात झालं. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
05
News18 Lokmat

काही संस्थांचं म्हणणं आहे की सर्वाधिक वणव्यांमुळे 2020 हे आतापर्यंत सर्वांत उष्ण वर्ष आहे तर काहींच मत आहे की 2016 हे सर्वाधिक उष्ण होतं. अमेरिकी नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फियर ॲडमिनिस्ट्रेशनच्या (NOAA) म्हणण्यानुसार 2016 हे 2020 पेक्षा 0.02 डिग्रींनी उष्ण होतं. तसं पाहिलं तर जागतिक जमीन आणि समुद्राच्या सरासरी तापमानापेक्षा 2020 मध्ये ते 0.98 डिग्री सेल्सियसनी जास्तच होतं. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
06
News18 Lokmat

सन 1880 पासून तापमानाच्या नोंदी केल्या जात आहेत त्याला सुमारे 140 वर्षं उलटली आहेत. 2020 या वर्षात जगभरातील वाहतूक दीर्घकाळ बंद होती, तरीही तापमान वाढलं ही बाब चिंताजनक आहे. सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
07
News18 Lokmat

NASA च्या म्हणण्यानुसार सुमारे 250 वर्षांपूर्वी झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर कार्बनडाय ऑक्साइडची पातळी जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढली आहे. वातावरणात मिथेनचं प्रमाण दुपटीहून अधिक आहे. पृथ्वीचं तापमान एक अंश सेल्सियसनी वाढलंय. तापमानवाढीमुळे वणव्यांचं प्रमाण वाढतंय. तरीही केवळ वणव्यांमुळेच पृथ्वीचं तापमान वाढलंय, असं विशेषज्ज्ञांचं मत नाही. (सांकेतिक फोटो (pixabay)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    जागतिक तापमानाची म्हणजे पृथ्वीच्या तापमानाची नोंद 1880 पासून ठेवली जात आहे. गेल्या 140 वर्षांत 2020 हे सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरलं आहे. संपूर्ण जगात लॉकडाउन होता त्यामुळे वाहन खूपच कमी प्रमाणात रस्त्यांवर होती. परिणामी कार्बन उत्सर्जन कमी झालं, मग तापमानही कमी व्हायला हवं होतं ना? मग तापमान का वाढलं? नासाच्या गोडार्ड इंस्टिट्यूट फॉर स्पेस स्टडिजने (Goddard Institute for Space Studies) या तापमानवाढीचं कारण सांगितलंय. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    2020 मध्ये ऑस्ट्रेलिया, सायबेरिया आणि अमेरिकी वेस्ट कोस्टच्या जंगलांत तर प्रचंड मोठ्या आगी लागल्या. त्या इतक्या मोठ्या होत्या की अटलांटिक वादळ आलं तरीही ती शमली नव्हती. याचा फटका पर्यावरणासोबतच अर्थव्यवस्थेलाही बसला. पावसाचं प्रमाण कमी होणं, उष्ण वारे वाहणं यामुळे जंगलांतल्या आगींचं प्रमाण वाढायला मदत झाली. कधीकधी वणवा लागायला नैसर्गिक कारणंही असतात. जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यावर किंवा गवतावर पावसातली वीज पडली की ती पेट घेतात आणि उष्ण हवेमुळे वणवा पसरतो. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    उष्ण हवामानामुळेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पाचवेळा वणवा पेटला. 1932 पासून सहा वेळा कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवे पेटले आहेत त्यापैकी पाच वणवे केवळ गेल्यावर्षीच पेटलेत. वणव्यातील राख वाऱ्याने वाहून आसमंतात भरून राहिल्याने कॅलिफोर्नियाच्या शेजारी असलेल्या सॅन फ्रान्सिस्को, ओरेगन आणि वॉशिंग्टन या राज्यांतील आसमंत धुळीनी भरून गेलं आणि नारंगी रंगाचं दिसत होतं. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    ऑस्ट्रेलियात 2019 च्या सप्टेंबरमध्ये जंगलात पेटलेला वणवा 2020 च्या पहिल्या काही महिन्यांत शांत झाला. लाखो हेक्टर परिसराला वणव्याचा फटका बसला. अग्निशमन दलाच्या लोकांसह 30 जणांचा बळी या वणव्यानी घेतला. त्याचबरोबर 63 लाख हेक्टरवरचं जंगल आणि पार्क आगीत भस्मसात झालं. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    काही संस्थांचं म्हणणं आहे की सर्वाधिक वणव्यांमुळे 2020 हे आतापर्यंत सर्वांत उष्ण वर्ष आहे तर काहींच मत आहे की 2016 हे सर्वाधिक उष्ण होतं. अमेरिकी नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फियर ॲडमिनिस्ट्रेशनच्या (NOAA) म्हणण्यानुसार 2016 हे 2020 पेक्षा 0.02 डिग्रींनी उष्ण होतं. तसं पाहिलं तर जागतिक जमीन आणि समुद्राच्या सरासरी तापमानापेक्षा 2020 मध्ये ते 0.98 डिग्री सेल्सियसनी जास्तच होतं. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    दीर्घ लॉकडाउननंतरही 2020 मध्ये नोंदवलं गेलं सर्वाधिक तापमान

    सन 1880 पासून तापमानाच्या नोंदी केल्या जात आहेत त्याला सुमारे 140 वर्षं उलटली आहेत. 2020 या वर्षात जगभरातील वाहतूक दीर्घकाळ बंद होती, तरीही तापमान वाढलं ही बाब चिंताजनक आहे. सांकेतिक फोटो (pixabay)

    MORE
    GALLERIES

  • 07 07