Home /News /videsh /

वुहानमधून कोरोनाविषयक रिपोर्ट देणाऱ्या महिलेला 4 वर्षांची शिक्षा; काय कलम लावलं वाचून बसेल धक्का

वुहानमधून कोरोनाविषयक रिपोर्ट देणाऱ्या महिलेला 4 वर्षांची शिक्षा; काय कलम लावलं वाचून बसेल धक्का

चीनमध्ये माध्यम स्वातंत्र्य नाही. जगभरात कोरोना विषाणू पसरला (Coronavirus) ज्या शहरातून पसरला त्या वुहानमधून (Reporting from Wuhan) रिपोर्टिंग करणारी 37 वर्षांची सिटिझन जर्नलिस्ट झँग झान (Zhang Zhan) हिला अटक झाली असून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
बीजिंग, 29 डिसेंबर : चीनमध्ये एकाधिकारशाही आहे आणि सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकापासून प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. माध्यमांना स्वातंत्र्य नाही त्यामुळेच चीनमधील घटना जगासमोर येतच नाहीत. ज्या काही बातम्या बाहेरच्या जगाला कळतात त्या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेच्या माध्यमातूनच कळतात. अशा स्थितीत अनेक नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनमधील परिस्थिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना सरकारी रोषाचा सामना करावा लागतो. जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) पसरला त्या वुहान (Wuhan citizen journalist) शहरातून रिपोर्टिंग करणारी 37 वर्षांची सिटिझन जर्नलिस्ट झँग झान (Zhang Zhan) हिला अटक झाली असून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  त्यामुळे चीनमधील माध्यमांच्या मुस्कटदाबीबद्दल पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात वॉल स्ट्रीट जर्नल आणि बीबीसीने बातम्या दिल्या आहेत. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येकावर विविध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं जातं. झँगवर भाडणं करून लोकांसाठी अडचण निर्माण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याच कलमाखाली तिला अटक करण्यात आली. सरकारविरोधी काही मतं सोशल मीडियावर मांडणाऱ्यांवर चिनी सरकार हाच कलम लावते. स्वतंत्र मीडियाचा मुद्दा चीनमध्ये स्वतंत्र मीडियाच अस्तित्वात नाही. त्यामुळे कोरोना काळात सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेतात. सोमवारी झँग आपल्या वकिलांसोबत कोर्टात सुनावणीला हजर होती. फेब्रुवारी महिन्यात वुहानमध्ये जाऊन कोरोना विषाणू महामारीसंदर्भात स्वतंत्रपणे रिपोर्टिंग केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. नेटवर्क ऑफ चायनीज ह्युमन राइट्स डिफेंडर्स (CHRD) या एनजीओने सांगितलं की, जँगनी फेब्रुवारीत वुहानमधून केलेल्या रिपोर्टिंगचं लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं. त्यात इतर मुक्त पत्रकारांना सरकार अटक करत असल्याबद्दल तसंच कोरोनापीडितांच्या नातेवाईकांचा छळ होत असल्याबद्दल जँगने सरकारला जाब विचारला होता. 14 मेला ती वुहानमधून भूमिगत झाली होती पण दुसऱ्या दिवशी शांघायपासून 640 किमी अंतरावर पोलिसांनी तिला अटक केल्याची माहिती मिळाली होती. नोव्हेंबर महिन्यात तिला (Wuhan Citizen journalist jailed) अधिकृत आरोपी करण्यात आलं. वुई चॅट, ट्विटर, युट्यूब या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व इतर माध्यमांतून तिने खोटी माहिती प्रसिद्ध केली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. परदेशी माध्यमांना मुलाखती देणं, कोरोनाच्या वुहानमधील परिस्थितीबाबत द्वेषकारक माहिती देणं हेही आरोप तिच्यावर ठेवण्यात आले होते. तिला चार ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा द्यावी अशी मागण कोर्टात करण्यात आली होती. अटकेविरोधात उपोषण अटक झाल्यानंतर जँगनी उपोषण सुरू केल्याने तिची तब्येत प्रचंड खालावली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला माझी तिची भेट झाली होती. तिला फिडिंग ट्युबने जबरदस्ती जेवायला घातलं जात होतं. तिला डोकेदुखी, चक्कर येणं आणि पोटदुखीचा त्रास होत होता. तिला शौचालयात जाण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते इतका अशक्तपणा आला आहे. तसंच तिला मानसिकदृष्ट्या खूप त्रास होत असल्याचं तिचे वकील जांग के के यांनी सांगितलं. दरम्यान, जँगची तब्येत लक्षात घेऊन सुनावणी पुढे ढकलण्यासाठी तिच्या वकिलांनी अर्ज केला होता असंही त्यांनी सांगितलं. हाँगकाँगमधील चीन सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल 2019 मध्ये तिला तुरुंगवास भोगावा लागला होता.
First published:

Tags: Coronavirus, Wuhan

पुढील बातम्या