वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडामधील लेकलँड इथं राहणारी एक महिला अचानक कोट्यधीश झाली आहे. तिने 2 मिलियन डॉलर्स म्हणजेच 16 कोटी 40 लाखांहून अधिक रुपयांचे लॉटरी बक्षीस जिंकले आहे. गेराल्डिन गिम्बलेट असे या महिलेचं नाव असून, तिने आपल्या आयुष्यातील बचतीचा वापर आपल्या मुलीच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी केला होता. न्यूयॉर्क पोस्टनुसार, गिम्बलेटची मुलगी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती, परंतु आता गिम्बलेटला दुहेरी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. कारण लॉटरी जिंकून महिलेला भरपूर पैसेदेखील मिळाले आहेत, त्यातून तिच्या मुलीच्या उपचाराचा खर्चदेखील पूर्ण झाला आहे.
When Geraldine Gimblet of #Lakeland picked up the last $2,000,000 BONUS CASHWORD Scratch-Off game, her passion for crossword games paid off to the tune of a $2 million-dollar top prize, but that’s just the beginning of a truly, winning story! 👉https://t.co/q5mFPaUHR4 pic.twitter.com/mv55B9zmz9
— Florida Lottery (@floridalottery) April 7, 2023
फ्लोरिडा लॉटरीच्या प्रेस रिलीजनुसार, गिम्बलेटने तिच्या मुलीच्या कॅन्सरच्या उपचाराचा शेवटचा टप्पा पूर्ण केल्याच्या दुसऱ्या दिवशी लेकलँडमधील गॅस स्टेशनवर 2 मिलियन डॉलरचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. गॅस स्टेशनच्या क्लर्कने सांगितलं की कोणतीही तिकिटं शिल्लक नाहीत, परंतु महिलेने त्याला पुन्हा शोधण्यास सांगितलं कारण तिला क्रॉसवर्ड गेम सर्वात जास्त आवडायचा. अशातच तिला शेवटचे तिकिट मिळाले. त्यानंतर लॉटरी जिंकल्याची माहिती गिम्बलेटला मिळाली आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. गिम्बलेटचे संपूर्ण कुटुंब तल्हासी येथील फ्लोरिडा लॉटरी मुख्यालयात पोहोचले. पुरस्कारासोबतच गिम्बलेटने आपली मुलगी आणि नातवासोबत फोटोसाठी पोज दिली. फ्लोरिडा लॉटरी कंपनीने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. गिम्बलेटच्या मुलीने सांगितले की ‘तिच्या आईने आजारी असताना तिच्या उपचारांसाठी तिच्या आयुष्यातील सगळी बचत संपवली होती. ज्या दिवशी माझ्या आईने हे तिकीट विकत घेतलं, त्या दिवशी मी दारावरची बेल वाजवली आणि कॅन्सरवरील उपचारांचा अंतिम टप्पा पूर्ण करून हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मी माझ्या आईसाठी खूप आनंदी आहे.’
एक चूक पडली महागात; 100 कोटींचा मालक रातोरात रस्त्यावर आलाट्विटर युजर्स ही बातमी ऐकून भावनिक झाले आहेत व विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलंय, ‘या कुटुंबासाठी खूप आनंद झाला आहे, आपल्या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आई आणि वडिलांना देवाने अशीच मदत करू दे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘अभिनंदन !!!! तुम्ही निःस्वार्थपणे मुलीला सगळं दिलं, त्या बदल्यात तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो,’’ अशा कमेंट्स करत युजर्स त्या महिलेचं अभिनंदन करत आहेत.