Home /News /videsh /

असा काय गुन्हा झाला? फक्त लेकीचा Social media Video लाइक केला म्हणून आईला डांबलं तुरुंगात

असा काय गुन्हा झाला? फक्त लेकीचा Social media Video लाइक केला म्हणून आईला डांबलं तुरुंगात

आईने लेकीचा सोशल मीडियावरील व्हिडीओ लाइक करताच आईची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

    हॅरिसबर्ग, 20 मे : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लाइक केले जातात, त्यावर कमेंट येतात, शेअर केले जातात. किती तरी पालकही असे आहेत जे आपल्या मुलांचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात किंवा आपल्या मुलांचे असे व्हिडीओ पाहून त्यांना कौतुक वाटतं. त्यामुळे पालकही आपल्या मुलांच्या व्हिडीओवर रिअॅक्ट होतात. अशाच एका आईने आपल्या लेकीचा व्हिडीओ लाइक केला. पण तिला असं करणं भारी पडलं आहे. तिला तुरुंगात डांबण्यात आलं आहे (Woman gets jail for liking daughter social media post). मुलीचा सोशल मीडियावरील व्हिडीओ लाइक केल्याने तिच्या आईची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अमेरिकेतील हे विचित्र प्रकरण आहे. या महिलेला 11 महिने ते 23 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता मुलीचा व्हिडीओ लाइक करणं यात या महिलेचा नेमका काय गुन्हा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाचा - कुटुंबाला भेटायला मिळावं म्हणून मुंबईचे हे बदमाश तुमची ट्रेन करत होते लेट; कांड पाहून पोलीसही चक्रावले आज तकने wtrf.com च्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचं नावा ट्रिस्टा प्राइझ आहे. तिच्यासह तिच्या नवऱ्यावर आपल्या पतीसह दोन मुलांचं शोषण करण्याचा आरोप होता. एबीसी न्यूजच्या 2020 च्या रिपोर्टनुसार ट्रिस्टा प्राइझ आणि तिचा नवरा सेठ प्राइझ पेन्सिलव्हेनियामध्ये राहणारं हे कपल. यांना 2020 साली मुलांचं शोषण केल्याच्या आरोपात अटक आली होती.   आपल्या दोन्ही मुलांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. कित्येक वेळा वेगवेगळ्या वस्तूंनी त्यांच्यावर हल्ला केला होता. ट्रिस्टाने ही संपूर्ण घटना पाहून त्याचा व्हिडीओही रेकॉर्ड केला होता. हे वाचा - दुर्दैवी! ढोकळा खाताना ठसका लागला आणि जीव गेला; मुंबईतील डॉक्टर नवरीची वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा त्यामुळे या कपलला कोणत्याही प्रकारे आपल्या दोन्ही मुलांच्या संपर्कात न राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं असताना या महिलेने आपल्या मुलीचा सोशल मीडियावर व्हि़डीओ लाइक केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या संपर्कात आली. त्यामुळे तिने चाइल्ड एब्युज प्रोबेशनचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळेच तिला ही शिक्षा देण्यात आली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media, Viral, Viral post

    पुढील बातम्या