लंडन, 12 मे : शारीरिक संबंध ठेवताना काही लोकांसोबत विचित्र काहीतरी घडल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. आता तर एका महिलेचा शारीरिक संबंधादरम्यान मृत्यू झाला आहे. बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवताना या महिलेचा जीव गेला आहे. बाथरूममध्येच ही महिला मृतावस्थेत सापडली आहे. तपासात तिचा मृत्यू हत्या नव्हे तर शारीरिक संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे (Woman died physical relation in bathroom).
ब्रिटनच्या स्टॅफोर्डशारमधील ही घटना. सँड्रा मुरे नावाची 40 वर्षांची ही महिला फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडली. वैद्यकीय तपासात तिच्या शरीरात मंकी डस्ट हे एक प्रकारचं ड्रग्ज असल्याचं सापडलं. शिवाय ती ज्यादिवशी मृतावस्थेत आढळली त्याच्या आधी एक पुरुष तिच्या खोलीतून बाहेर पडला होता.
सुरुवातीला या महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पोलीस त्याचदृष्टीने तपास करत होते. पण या महिलेचा मृत्यू शारीरिक संबंधादरम्यान झाल्याचं समोर आलं आहे. ती सेक्स वर्करही होती, याचे पुरावे पोलिसांनी दिले आहेत सँड्रा फक्त महिलांसाठी असलेल्या एका इमारतीत राहत होती. जिथं पुरुषांना एंट्री बॅन होती. पण तिच्या घराच्या खिडकीतून पुरुष ये-जा करायचे.
हे वाचा - काय म्हणावं याला! 135 मुलांचा बाप, 125 नातवंडांचा आजोबा; 28 बायकांसमोर बांधली 37 वी लगीनगाठ
31 मे 2021 रोजी तिचा मृत्यू झाला. त्या मध्यरात्री तिला इमर्जन्सी सर्व्हिसच्या स्टाफने पाहिलं होतं. मेट्रो यूकेच्या रिपोर्टनुसार त्याने पोलिसांना सांगितलं की, "रात्री 12.20 वाजता मला जोरात आवाज ऐकू आला. त्यानंतर मी त्या महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. रात्री एक वाजता पुन्हा आवाज आला मी पुन्हा तिथं गेलो. महिलेने दरवाजाच्या पलिकडून उत्तर दिलं. 1.30 वाजता मी पुन्हा ती महिला ठिक आहे की नाही याची खात्री करायला गेलो. तेव्हा मला काहीच उत्तर मिळालं नाही. पण तरी मला काही संशय आला नाही. पण सकाळी 7.55 वाजता तिच्या रूममधून एक पुरुष बाहेर आला. ज्याला मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. मी तिच्या घरात गेलो ती बाथरूममध्ये होती. मी तात्काळ फोन करून अॅम्बुलन्स बोलावली"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Sexual health, World news