वॉशिग्टंन 07 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. त्यावर अजुन औषध सापडलं नसल्याने सर्व जग चिंतेत आहे. बाधित आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा दररोज वाढतोच आहे. यावर लस शोधण्यासाठी जगभर संशोधनही सुरू आहे. मात्र त्याला काही महिन्यांचा अवधी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या डॉ. अँथोनी फाउची यांच्या वक्तव्याने चिंता वाढली आहे. जोपर्यंत कोरोना व्हायरसवर लस शोधली जात नाही तोपर्यंत या व्हायरसला संपवणं शक्य नाही असं ते म्हणाले. डॉ. फाउची हे व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख आहे. याबाबतचं वृत्त बीबीसीने दिलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, कोरोनापूर्वी जसा अमेरिका होता तसं सगळं ठिक होईल याची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. हा व्हायरस आता दीर्घकाळ त्रास देणारा ठरणार आहे. आपल्याला अनेक गोष्टी बदलाव्या लागतील. हा पसरणारा आजार असल्याने जास्त चिंतेचं कारण आहे. मात्र यावर उपाय निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जगभर या व्हायरसवर संशोधन सुरू आहे. काही औषध कंपन्यांनी लस शोधल्याचा दावाही केलाय. त्याच्या चाचण्या सुरू असून त्यांचे निष्कर्ष आल्यानंतर त्यावर व्यापक चर्चा होऊन औषध ठरण्याची शक्यता आहे. हे वाचा - Covid-19 पासून बचावासाठी लोकांनी वापरलेल्या या जगावेगळ्या मास्कच्या तऱ्हा! अमेरिकेच्या (America) एका कंपनीने मार्च महिन्याच्या मध्यात कोरोना (Covid - 19) लसीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र आता दुसर्या पेनसिल्व्हेनिया बायोटेक कंपनीनेही कोरोना लसीची चाचणी सुरू केली आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या या लसीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशाननाने मंजूरी दिली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमेरिकेतील न्युयॉर्क शहराला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. येथे मृत्यूचा आकडा मोठा आहे. हे वाचा - एक कोरोना रुग्ण 30 दिवसांत करू शकतो 406 जणांना लागण, सरकारने दिला धोक्याचा इशारा संशोधकांच्या मते सोमवारी ही लस माणसांना देण्यात आली आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सच्यावतीने विकसित केलेली ही लस तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि एपिडेमिक प्रिपेडेन्स इनोव्हेशनतर्फे निधी देण्यात आला आहे. इनोव्हिओ फार्मास्युटिकल्सनी तयार केलेल्या आयएनओ-4800 या लसची सोमवारपासून मनुष्यांवर तपासणी केली जात आहे. मनुष्यावर कोरोना लस चाचणी घेण्यास परवानगी देण्यात आलेली ही अमेरिकेतील दुसरी कंपनी आहे. यापूर्वी, मॅसेच्युसेट्स बायोटेक मॉडर्नने मार्चच्या मध्यात मनुष्याची चाचणी सुरू केली होती. (संपादन - अजय कौटिकवार)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







