वॉशिंग्टन : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. तो २४ वर्षांचा असून न्यू जर्सी इथला रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. हादी मटर असं हल्ला करणाऱ्याचं नाव आहे. त्याने भर कार्यक्रमात लेखक सलमान यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यामागे नेमकं काय कारण? हल्लेखोर नेमका आहे कोण? याबद्दल आज जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. रश्दी यांच्या स्थितीवर पुढील गोष्टी निर्भर करतात असं त्यांनी म्हटलं आहे. त्याने हल्ल्याचं कारण अजूनही पोलिसांना सांगितलं नाही. तर मटरने या हल्ल्यात कोणाचाही अजून हात नाही असंही स्पष्ट केलं आहे.
काही वृत्त आणि अहवालानुसार मटरच्या या हल्ल्यानंतर त्याला इराणकडून सहानुभूती मिळू शकते अशीही चर्चा आहे. त्याने इराणसाठी हे केल्याचीही चर्चा आहे. एनबीसीच्या एका रिपोर्टनुसार मटरचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मटर सध्या न्यू जर्सीमध्ये राहात आहे. त्याचं शेवटचं लोकेशन मॅनहट्टनहून हडसन नदीजवळ बर्गन काउंटी इथे जवळपास दिसलं होतं. शुक्रवारी तिथे एफबीआर एजंटने तिथे जाऊन माहिती काढली.
मटरकडे न्यू जर्सीमधील ड्रायव्हिंग लायसन्स देखील होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एवढंच नाही ज्या कार्यक्रमात त्याने घुसून हल्ला केला त्या कार्यक्रमाचा पासही त्याच्याकडे उपलब्ध होता.
मटरच्या सोशल मीडिया पोस्टवरून तो शिया कट्टरपंथींचं समर्थन करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. त्याला इराण सरकारबद्दलही सहानुभूती आहे.
जेव्हा हल्लेखोर तिथे आला तेव्हा त्याने काळ्या रंगाचा मास्क तोंडावर लावला होता. हा एक स्टंट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रत्यक्षात अजून अनेक वाद असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack