जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / UAE च्या इतिहासात पहिल्यांदाच जुम्म्याच्या दिवशी उघडली कार्यालये आणि शाळा! का घेतला निर्णय, जाणून घ्या

UAE च्या इतिहासात पहिल्यांदाच जुम्म्याच्या दिवशी उघडली कार्यालये आणि शाळा! का घेतला निर्णय, जाणून घ्या

UAE च्या इतिहासात पहिल्यांदाच जुम्म्याच्या दिवशी उघडली कार्यालये आणि शाळा! का घेतला निर्णय, जाणून घ्या

UAE Weekly off Change: यूएई प्रशासनाने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये साप्ताहिक सुट्टी बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. सार्वजनिक क्षेत्रासाठी हा बदल करण्यात आला आहे. आखाती देशांमध्ये यूएई आधुनिक बदलांसाठी ओळखले जाते. राजधानी दुबई पश्चिम आशिया प्रदेशातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखलं जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 7 जानेवारी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पहिल्यांदाच जुम्म्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (working Friday) कार्यालये आणि शाळा उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. देशातील सरकारने आता अधिकृतपणे शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) साप्ताहिक सुट्टी (weekly off) म्हणून घोषित केली आहे. आता भविष्यात शुक्रवारीही सामान्य दिवसांप्रमाणेच कामकाज होणार आहे. इस्लाम धर्मात शुक्रवारी पवित्र शुक्रवारच्या नमाजमुळे देशात सुट्टी होती. मात्र, आता प्रशासनाने ही व्यवस्था बदलली आहे. यूएईमध्ये (UAE) 2006 पर्यंत गुरुवार आणि शुक्रवार साप्ताहिक सुटी मानली जात होती. मात्र, त्यानंतर नियम बदलण्यात आले. आज शुक्रवारी कार्यालये उघडी राहिल्याने कर्मचाऱ्यांनी कामाच्या गडबडीत मशिदी गाठल्या. नमाज अदा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन काम पूर्ण केले. काहींनी नाराजी व्यक्त केली मात्र, साप्ताहिक सुट्टीतील या बदलामुळे काही जण संतप्तही झाले आहेत. NDTV च्या रिपोर्टनुसार, दुबईत हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करणारी ब्रिटीश व्यक्ती रेचेल किंग म्हणते, की मला शुक्रवारी सुट्टी आवडते. मला या देशाबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे तुमची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी असते. म्हणजेच या दिवशी तुम्ही आरामात मार्केट आणि मॉलमध्ये जाऊ शकता. मात्र, आता हा दिवस शुक्रवारऐवजी शनिवार असेल. इटलीतून भारतात आला कोरोनाचा ‘व्हायरल बॉम्ब’, विमानानं आलेले 125 प्रवासी Positive प्रशासनाने गेल्या डिसेंबरमध्ये धक्कादायक बदल केला यूएई प्रशासनाने गेल्या डिसेंबर महिन्यात साप्ताहिक सुट्टी बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. मात्र, सार्वजनिक क्षेत्रासाठी हा बदल करण्यात आला आहे. आखाती देशांमध्ये UAE आधुनिक बदलांसाठी ओळखला जाता. तर राजधानी दुबईला पश्चिम आशिया प्रदेशातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dubai , UAE
  • First Published :
जाहिरात
जाहिरात