जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबद्दल घेतलेल्या निर्णयाचा भारतीयांवरही होणार मोठा परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबद्दल घेतलेल्या निर्णयाचा भारतीयांवरही होणार मोठा परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबद्दल घेतलेल्या निर्णयाचा भारतीयांवरही होणार मोठा परिणाम

डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांनी गुरुवारी जाहीर केलं की, H1B व्हिसावरील (Visa) निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येत आहेत. ज्या कारणासाठी हे निर्बंध (H1B Visa ban) लादले होते ती कारणं आणखी बदलली नाहीत, असंही ते म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 जानेवारी: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांनी अमेरिकन कामगारांच्या (American Workers) हितासाठी H1B व्हिसा (H1B Visa) तसेच इतर परदेशी व्हिसावरील निर्बंधांचा कालावधी (Ban Extend) आणखी तीन महिने (3 Months) वाढवला आहे. यावेळी ट्रम्प म्हणाले की, कोरोना विषाणूचा (Corona virus) उपचार आणि लस  (Vaccine) उपलब्ध आहे, परंतु श्रम बाजाराला आणि सार्वजानिक आरोग्याला कोरोना विषाणूचा असलेला धोका कमी झालेला नाही. या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीय आयटी क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांसोबतच अनेक अमेरिकन आणि भारतीय कंपन्यांवर होणार आहे. कारण यांना अमेरिकन सरकारने H1B व्हिसा दिला होता. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल आणि 22 जून रोजी विविध श्रेणीतील वर्कींग व्हिसावर बंदीचे आदेश घातले होते. हा संबंधित आदेश 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार होता. पण हा आदेश संपुष्टात येण्यापूर्वी काही तास अगोदर ट्रम्प यांनी हे निर्बंध आणखी वाढवले आहेत. त्यांनी गुरुवारी जाहीर केलं की, H1B व्हिसावरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येत आहेत. यावेळी ते म्हणाले की, ज्या कारणासाठी हे निर्बंध लादले होते ती कारणं आणखी बदलली नाहीत. H1B व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. या व्हिसा अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना आपल्या व्यवसायांसाठी परदेशी कामगारांची सेवा घेण्याची परवानगी मिळते. तंत्रज्ञान क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्या या व्हिसाद्वारे भारत आणि चीन सारख्या देशांतून दरवर्षी हजारो कर्मचाऱ्यांना काम देत असतात. त्याचबरोबर इतर अनेक कारणांसाठी अमेरिकन कंपन्यांना या परदेशी कामगारांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम H1B व्हिसाच्या नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय व्यावसायिकांवरही होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात