कीव,07 मार्च: रशियाचे सैन्य युक्रेनवर (Ukraine-Russia War) पूर्ण ताकदीनिशी हल्ला करत आहे. रशिया युक्रेन युद्धाशी संबंधित भयावह फोटो दररोज समोर येत आहेत. रविवारी रशियन (Russian Army)लष्करानं क्षेपणास्त्र हल्ल्यात (Missile Attack)विनित्सिया विमानतळ उद्ध्वस्त केलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ही माहिती दिली. या विमानतळावर रशियन सैन्यानं एकामागून एक 8 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मला नुकतीच माहिती मिळाली आहे की विनित्सियामध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. येथे रशियन सैन्यानं विमानतळावर 8 क्षेपणास्त्रे डागली आहेत, ज्यामुळे हे विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाला 11 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. यादरम्यान, रशियन सैन्यानं युक्रेनमधील अनेक शहरे आणि हवाई तळांना लक्ष्य केलं आहे. जिथे त्यांनी क्षेपणास्त्रे आणि प्राणघातक बॉम्ब हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
‼️ Urgent appeal by President @ZelenskyyUa: a missile strike on #Vinnytsia consisted of eight missiles; the airport is completely destroyed.
— Verkhovna Rada of Ukraine - Ukrainian Parliament (@ua_parliament) March 6, 2022
The President called on the world to close the skies over #Ukraine and provide Ukraine with aircraft. pic.twitter.com/0s8nUneRZP
रशिया आणि बेलारूसच्या सीमेपासून दूर मध्य युक्रेनच्या पश्चिमेकडील भागात विनित्सिया हा एकमेव प्रदेश आहे जिथे असे हल्ले कमी झाले आहेत. त्याच वेळी, या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाचे पुढील हल्ले रोखण्यासाठी युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लागू करण्याच्या पाश्चात्य शक्तींच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. युक्रेनची भारताला भर Live ब्रिफिंगमध्ये विनंती रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine) सातत्यानं हल्ले करत आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा (Ukraine’s Foreign Minister Dimitro Kuleba) यांनी भारताला रशियाला युद्ध थांबवण्यास सांगण्याचं आवाहन केलं आहे. टीव्हीवर संबोधित करताना, कुलेबा यांनी रशियावर युद्धविराम (ceasefire) कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. युद्धग्रस्त भागातून परदेशी विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी गोळीबार थांबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. कुलेबा म्हणाले, 30 वर्षांपासून युक्रेन हे आफ्रिका आणि आशियातील हजारो विद्यार्थ्यांसाठी स्वागतार्ह घर होते. युक्रेननं परदेशी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली आहे. हॉटलाइन्सची स्थापना केली आहे. दूतावासांसोबत काम करत आहे. युक्रेन सरकार त्यांच्यासाठी सतत काम करत आहे. ज्या देशांचे नागरिक युक्रेनमध्ये आहेत त्यांची सहानुभूती मिळवण्याचा रशिया प्रयत्न करत असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. परदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत रशियानं मदत केल्यास या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असे ते म्हणाले.