बीजिंग, 19 डिसेंबर : चीनमधून जगभरात पोहचलेल्या कोरोना संसर्गाने तब्बल दोन वर्ष हाहाःकार माजवला होता. त्यावेळी चीनने या संसर्गावर वेळेत नियंत्रण मिळवल्याने तिथे जास्त हानी झाली नाही. मात्र, आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना संसर्गाने डोकं वर काढलं आहे. येथे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध प्रचंड विरोधानंतर शिथिल करण्यात आले आहेत. यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. चीनमध्ये सुरुवातीपासूनच कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ऑक्टोबरमध्ये चायनीज सोशल मीडियावर तांदूळ मागतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा चीनमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस औषध मागताना दिसत आहे. ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेडिकल स्टोअरमध्ये औषध मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती काळ्या रंगाचे जॅकेट घालून गुडघ्यावर बसून मेडिकल स्टोअरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून औषधांची मागणी करत आहे. मात्र, त्याला औषध मिळते की नाही हे व्हिडिओमध्ये पुढे कळू शकलेले नाही. हा व्हिडिओ चीनच्या कोणत्या भागातील आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Outside #Babaoshan Cemetery in #Beijing, a long line of waiting cars. The man who shot this video says these are only people who want to have the bodies temporarily stored there. It is even more difficult to get the cremation service appointment.
— Inconvenient Truths by Jennifer Zeng 曾錚真言 (@jenniferzeng97) December 14, 2022
More: https://t.co/I6avqc1S9e pic.twitter.com/DjGFHYbxus
त्याचवेळी ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये गाड्यांची लांबच लांब रांग दिसत आहे. हा व्हिडिओ चिनी समाजसेविका जेनिफर झेंगने तिच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओबाबत जेनिफरने सांगितले की, कारची ही लांबलचक रांग बीजिंगमधील स्मशानभूमीच्या बाहेर आहे. व्हिडिओचे वर्णन करताना जेनिफरने ट्विटरवर लिहिले की, व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, हे असे लोक आहेत ज्यांना तात्पुरते मृतदेह तिथे ठेवायचे आहेत. येथे अंत्यसंस्कार सेवेसाठी अपॉइंटमेंट मिळणे देखील कठीण झाले आहे.
दुसरीकडे, वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दररोजच्या नवीन प्रकरणांमुळे चीनच्या आरोग्य सुविधा कमकुवत झाल्या आहेत. चीनची दोन वर्षे केवळ नागरिकांना लस देण्यात आणि रुग्णालयातील संसाधने मजबूत करण्यात वाया गेली. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने स्मशान स्थळांवरही लांबच लांब रांगा लागल्या आहेत.