इजमीर 30 ऑक्टोबर: भीषण भूकंपाने (Powerful Earthquake) शुक्रवारी तुर्की(Turkey)ला जोरदार तडाखा दिला. या भूकंपाने इझमिर (Izmir) हे शहर हादरलं आहे. या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर 7 एवढी भीषण होती. त्यानंतर शहरात त्सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शहरांमधल्या रस्त्यांवर पाणी घुसलं असून त्याचा वेगही प्रचंड आहे. या प्रचंड वेगात घरं, गाड्या आणि इतर सामान वाहून गेलं. हा वेग एवढा प्रचंड होता की बचाव कार्यही करता आलं नाही. सोशल मीडियावरही याचे अनेक VIDEO व्हायरल झाले असून ते पाहिले तरी थरकाप उडाल्याशीवाय राहणार नाही. CNNने काही संस्थांचा हवाला देत भूकंपाची तीव्रता 7.0 एवढी असल्याचं सांगितलं. इझमिर सोबतच एजियन आणि मरमरा या शहरांसह राजधानी इस्तंबूलमध्येही हादरे जाणवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. इझमिर हे तुर्कीतलं तिसरं मोठं शहर आहे. त्यामुळे प्रचंड नुकास झालं असं सोशल मीडियावर सांगितलं जातं मात्र तुर्कीच्या प्रशासनाने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र भूकंपाची तीव्रता पाहता मोठं नुकसान झालं असावं असा दावा केला जात आहे.
Another tsunami footage from the earthquake in Izmir province of Turkey.
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
This one is really dangerous pic.twitter.com/62zfddWSi8
या भूकंपाबाबत अनेक दावे आणि प्रतिदावे करण्यात येत आहेत. तर सोशल मीडियावर महापूरच आला आहे. त्यामुळे चर्चेलाही उधाण आलं आहे. जोपर्यंत याबाबत सरकारकडून वस्तुस्थिती सांगितली जात नाही तोपर्यंत खरी माहिती बाहेर येणार नाही असं म्हटलं जातं
Distressing images out of Izmir, Turkey’s third biggest city, hit minutes ago by a 6.8 earthquake (epicenter was on the Aegean) pic.twitter.com/qmkxzIvlQh
— Piotr Zalewski (@p_zalewski) October 30, 2020
समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या शहरांमध्ये त्सुनामीसारखी परिस्थिती असून लोक सुरक्षीत स्थळी आश्रय घेत आहेत असा दावाही केला गेला आहे. एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप आल्यावर सुनामी येत असते असं तज्ज्ञांचं मत आहे.