मराठी बातम्या /बातम्या /विदेश /US School Shooting: धक्कादायक! अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार, 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू

US School Shooting: धक्कादायक! अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार, 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू

 नॅशविले येथे सोमवारी एका खाजगी शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

नॅशविले येथे सोमवारी एका खाजगी शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

नॅशविले येथे सोमवारी एका खाजगी शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

टेनेसी : अमेरिकेतील टेनेसी इथल्या एका खासगी शाळेमध्ये अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नॅशविले येथे सोमवारी एका खाजगी शाळेत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेत तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात काही लोक जखमीही झाले आहेत. हल्लेखोराकडे दोन असॉल्ट रायफल आणि एक हँडगन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. गोळीबर सुरू असताना शाळेत नर्सरी ते सहावीपर्यंतचे सुमारे 200 विद्यार्थी उपस्थित होते.

देशात शाळांवर हल्ला होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. ख्रिश्चन शाळेत झालेल्या हल्ल्यात 3 विद्यार्थी, 3 वयस्क आणि 1 अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:
top videos

    Tags: United states