जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / VIDEO दोन वर्षांच्या मुलीनं मास्क घातला नाही, म्हणून कुटुंबाला विमानाच्या बाहेर काढलं!

VIDEO दोन वर्षांच्या मुलीनं मास्क घातला नाही, म्हणून कुटुंबाला विमानाच्या बाहेर काढलं!

VIDEO दोन वर्षांच्या मुलीनं मास्क घातला नाही, म्हणून कुटुंबाला विमानाच्या बाहेर काढलं!

दोन वर्षांच्या मुलीनं मास्क घातला नाही म्हणून आपल्या पूर्ण कुटुंबाला विमानातून उतरवण्यात आलं, असा आरोप करत या महिलेनं इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 14 डिसेंबर : कोराना व्हायरस (Coronavirus) पासून संरक्षण करण्यासाठी मास्क घालणं सर्वच देशांमध्ये गरजेजं आहे. विना मास्क विमान प्रवास करण्याची परवानगी कुणालाही नाही. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची संख्या सर्वात जास्त असल्यानं आता तिथं अनेक कडक नियम करण्यात आले आहेत. दोन वर्षांच्या मुलीनं मास्क घातला नाही म्हणून आपल्या पूर्ण कुटुंबाला विमानातून उतरवण्यात आलं, असा आरोप अमेरिकेतल्या (United States) मधील एका महिलेनं केला आहे. या महिलेनं इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे.  ‘डेअली मेल’ नं हे वृत्त दिलं आहे. काय घडला प्रसंग? एलिस ऑर्बन (Eliz Orban) या महिलेनं अक्षरश: रडत हा व्हिडिओ तयार केलाय. एलिस तिचा नवरा आणि दोन वर्षाच्या मुलगी विमानानं कोलोरोडोहून नेवार्क, न्यू जर्सीला विमानानं जाणार होते. ‘मी आणि माझ्या नवऱ्यानं विमानात मास्क घातला होता. मात्र माझी दोन वर्षाची मुलगी मास्क घालण्यास तयार नव्हती. त्यामुळे मुलीसह आम्हाला विमानातून उतरवण्यात आलं, असा दावा एलिसनं केला आहे. व्हिडिओत काय आहे? या व्हिडिओत एलिस यांची दोन वर्षांची मुलगी विमानात मास्क घालण्यास तयार नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर तिनं मास्क घालावा म्हणून मनधरणी करणाऱ्या तिच्या आई-वडिलांचं देखील ती काही ऐकत नव्हती. त्यानंतर विमानाच्या कर्मचाऱ्याने ऑर्बन दाम्पत्याला सर्व सामान घेऊन बाहेर पडण्याची सूचना केली. त्यावर एलिसचा नवरा आणि विमान कर्मचाऱ्यामध्ये थोडा वाद देखील झाला. या वादानंतर ते विमानातून बाहेर पडले. दरम्यान, एलिस यांच्या कुटुंबीयांना भविष्यात युनायटेड एअरलाईन्सच्या (United Airlines)  विमानानं प्रवास करण्याची बंदी घालण्यात आलेली नाही, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात