अमेरिका: जो बायडेन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पहिलाच मोठा धक्का, चीनलाही दिला कडक इशारा

अमेरिका: जो बायडेन यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना पहिलाच मोठा धक्का, चीनलाही दिला कडक इशारा

निवडणूक प्रचारात बिडेन यांनी चीनविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचा इशार दिला होता. अमेरिका चीनविरुद्ध आर्थिक निर्बंध लादू शकते असे संकेतही त्यांनी दिले होते.

  • Share this:

वॉशिंग्टन 20 नोव्हेंबर: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (US President elect Joe Biden) यांनी महत्त्वाची घोषणा करत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का दिला आहे. त्याचबरोबर चीनलाही धोक्याचा इशारा दिला आहे. 20 जानेवारीला शपथ घेताच अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर चीनलाही धोक्याचा इशारा देत मर्यादा ओलांडू नका असं बजावलं आहे.

WHO चीन धार्जिनी असून चीनच्याच तालावर नाचते आहे. कोरोना संकट काळात त्यांनी चीनचीच तळी उचलून धरली होती अशी घोषणा करत ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात WHOमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिका WHOला प्रचंड निधी देते मात्र ते चीनची बाजू घेतात असा आरोप ट्रम्प यांनी केला होता.

मात्र जगात सध्या कोविड विरुद्ध युद्ध सुरू असून त्यासाठी अमेरिका पुन्हा WHOमध्ये सहभागी होणार असल्याचं बायडेन यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर चीनने आपल्या मर्यादा ओलांडू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवडणूक प्रचारात बिडेन यांनी चीनविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचा इशार दिला होता. अमेरिका चीनविरुद्ध आर्थिक निर्बंध लादू शकते असे संकेतही त्यांनी दिले होते.

दरम्यान, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प यांना टक्कर देत, अमेरिकी राष्ट्रपती निवडणूकीत मोठा विजय मिळवला. जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती ठरले आहेत. बायडन यांना 7 कोटीहून अधिक मतं मिळाली. अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी यापूर्वी इतकी मत कधीही मिळाली नव्हती.

'रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकत मोठा झालो' असं आहे बराक ओबामांचं INDIA कनेक्शन

निवडणूकीच्या निकालांनंतर, ट्रम्प यांच्याकडून सतत प्रतिक्रिया येत आहेत. या निकालांविरोधात मोठी लढाई लढणार असल्याचं सांगत, निवडणूक निकालांबाबत सुप्रीम कोर्टात जाण्याचं ते वारंवार सांगतायेत. परंतु ट्रम्प यांच्याकडे याबाबत कोणतेही पुरावे नसल्याने, ट्रम्प यांनी आपली हार मानली होती, पण आता पुन्हा 'I WON THE ELECTION!' म्हणत त्यांनी यूटर्न घेतला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 20, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या