मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

3 दिवसांपासून कानात सुरू होत्या असहय्य वेदना, स्वीमिंग करताना झाला होता भयंकर प्रकार

3 दिवसांपासून कानात सुरू होत्या असहय्य वेदना, स्वीमिंग करताना झाला होता भयंकर प्रकार

तीन दिवसांपासून या व्यक्तीच्या कानात असहय्य वेदना सुरू होत्या.

तीन दिवसांपासून या व्यक्तीच्या कानात असहय्य वेदना सुरू होत्या.

तीन दिवसांपासून या व्यक्तीच्या कानात असहय्य वेदना सुरू होत्या.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 13 जानेवारी : सर्वसाधारणपणे कानात खाज येत असेल तर मळ जमा झाल्याची शक्यता व्यक्त करून काम स्वच्छ केला जातो. सर्दी झाल्यावरही अनेकदा कानात वेदना (Ear pain) होतात. मात्र नेहमीच हे कारण नसतं. तर काही वेळेस कान दुखण्याचं कारण आपल्या शक्यतेपलीकडचं असतं. अशीच एक घटना न्यूझीलँडमधून समोर आली आहे. येथील एका व्यक्तीच्या कानात असहय्य वेदना सुरू होत्या. त्याने जेव्हा डॉक्टरांना दाखवला तर तेदेखील हैराण झाले. या व्यक्तीच्या कानातून डॉक्टरांनी चक्क झूरळ बाहेर काढलं.

ही घटना न्यूझीलँडच्या ऑकलँड येथील आहे. 'द गार्जियन'च्या एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव जेन वेडिंग असं आहे. दोन दिवसांपासून या व्यक्तीच्या कानात वेदना सुरू होत्या. त्याला नेमकं कारणही लक्षात येत नव्हतं. दरम्यान स्वीमिंग करीत असताना काहीतरी कानात गेल्याची शक्यता व्यक्तीने व्यक्त केली. आणि त्याची शक्यता खरी ठरली.

जेव्हा ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली तेव्हा स्वीमिंगदरम्यान कानात पाणी गेल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. मात्र कारण काहीतरी वेगळंच होतं. दोन दिवस झाले तरी व्यक्तीला आराम मिळत नव्हता. त्याच्या कानातील वेदना वाढत होत्या. यानंतर डॉक्टरांनी मशीनचे तपासणी केली तर तेदेखील हैराण झाले. त्याच्या कानात एक मोठ्या आकाराचं झुरळ होतं. डॉक्टरांनी कानातील झुरळ काढण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा-8 वीतील मुलगी हात जोडत राहिली तरीही नराधम दीड वर्षे करीत राहिला बलात्कार...

डॉक्टरांनी मशीनने झुरळ बाहेर काढलं. ते मृत होतं, मात्र यादरम्यान व्यक्तीच्या कानात असहय्य वेदना होत होत्या. सध्या व्यक्तीची तब्येत बरी असल्याचं सांगितलं जात आहे. हे झुरळ व्यक्तीच्या कानात कसं काय गेलं, याबाबत डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं. सध्या व्यक्तीच्या प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Ear, Health