कीव, 05 मार्च: रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine War) युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. शुक्रवारही रशियाकडून युक्रेनवर वारंवार हल्ले होत होते. युक्रेनवर रशियाची कारवाई सुरूच आहे. दुसरीकडे, संध्याकाळी उशिरा युक्रेनच्या सैनिकांनी दोन जिवंत रशियन बॉम्बसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
युक्रेनियन सैनिकांनी पोस्ट केलेल्या आणखी एका फोटोत सगळं विध्वंस झाल्याचं दिसून येत आहे. हे फोटो अख्तिरका शहरातील औष्णिक वीज केंद्राचा आहे. जे रशियन सैनिकांनी काबीज करण्यासाठी वाईटरित्या नष्ट केले.
दुसरीकडे, रशिया अण्वस्त्रांबाबत खोटे बोलत असल्याचं युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे. युक्रेन कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे बनवत नाही. युक्रेनच्या राज्य अणु कंपनीनं म्हटलं आहे की, अणुभट्टीवर रशियन हल्ल्यात तीन युक्रेनियन सैनिक ठार झाले आणि दोन गंभीर जखमी झाले.
त्याच वेळी, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, जपान रशियाच्या आक्रमणाशी लढण्यासाठी युक्रेनला बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि इतर संरक्षण सामग्री पाठवत आहे.
शुक्रवारी UNHRC मध्येही युक्रेन संकटावर मतदान घेण्यात आले. रशियाविरोधातील ठरावावरील या मतदानात भारतानं सहभाग घेतला नाही. मानवाधिकार उल्लंघनाच्या चौकशीसाठी हे मत घेण्यात आलं आहे.
रशियाचा सर्वात मोठ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला
काल रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर (nuclear power plant) बॉम्बफेक केला. हा युक्रेनचा सर्वात मोठा पॉवर प्लांट आहे, येथे 6 अणुभट्ट्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रशियन सैन्याची या शहराकडे वाटचाल सुरू होती. आता इथे जबरदस्त बॉम्बहल्ले सुरु केले. युक्रेनचे म्हणणं होतं की, प्लांटमधून धूर निघताना दिसत होता. रशियानं युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट (Zaporizhzhia Oblast) प्रांतातील एनरहोदर शहरात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांचा दावा आहे की हल्ल्यानंतर युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रापासून धूराचे लोट उठताना दिसत आहेत.
या प्लांटला लागलेली आग काही वेळात विझवण्यात आली. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.