मॉस्को, 25 फेब्रुवारी : रशियन-युक्रेन युद्धाला जवळपास वर्ष होत आलं आहे. अद्याप कोणीही माघार घेण्याचं नाव घेताना दिसत नाही. अशातच रशियातून एक मोठी बातमी येत आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचा अंत जवळ आल्याचा दावा एका माजी रशियन राजकारण्याने केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, देशाच्या फेडरल असेंब्लीचे माजी डेप्युटी इल्या पोनोमारेव्ह यांनी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाहीत. ते त्यांच्या पुढील वाढदिवशी 7 ऑक्टोबरला दिसणार नाही. यूके न्यूज एजन्सी एक्सप्रेसशी बोलताना पोनोमारेव्ह म्हणाले की, 2014 मध्ये रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमियावर युक्रेन जेव्हा दावा करेल तेव्हा पुतिन यांचं पतन होईल. क्रिमियाच्या विलयीकरणाच्या विरोधात मतदान करणारे पोनोमारेव्ह हे एकमेव डेप्युटी होते आणि पुतिन यांच्यावर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा उघडपणे आरोप केला होता. कठोर कारवाईच्या भीतीने ते 2016 पासून युक्रेनमध्ये निर्वासित जीवन जगत आहे. पोनोमारेव्ह यांनी एक्सप्रेसला सांगितले की युक्रेनियन सैन्य “एक दिवस” क्रिमियामध्ये प्रवेश करेल आणि पुतिनच्या राजवटीचा अंत करेल. पुतिन यांनी आता ज्या प्रकारे स्वत:ला प्रमोट केलं आहे, ते असा लष्करी पराभव सहन करू शकणार नाहीत, असे ते म्हणाले. युक्रेनबरोबरच्या युद्धावर बोलताना पोनोमारेव्ह म्हणाले की पुतिन यांना माहित आहे की ते युद्ध हरत आहेत. परंतु, तरीही त्यांना विश्वास आहे की त्यांचे सैन्य जिंकेल. वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानात लपलेल्या दाऊदच्या मुसक्या आवळण्याची तयारी; NIA टीम दुबईला पोहोचली रशियन खासदाराने पुतीन यांच्या भाषणाची खिल्ली उडवली दुसऱ्या एका घटनेत रशियन संसदेने पुतिन यांच्या भाषणादरम्यान कानावर नूडल्स लटकवून त्यांची खिल्ली उडवली. पुतीन यांच्या भाषणादरम्यान रशियाचे खासदार मिखाईल अब्दाल्किन यांनी कानात नूडल्स लावून त्यांचे भाषण ऐकले. मिखाईलचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ‘कानात नूडल्स टांगणे’ हा एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करणे किंवा मूर्ख करणे होय. या व्हिडीओच्या माध्यमातून ते दाखवत आहेत की या प्रकरणात पुतिन खोटे बोलून इतरांची दिशाभूल करत आहेत किंवा मूर्ख बनवत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.