क्विव, 26 सप्टेंबर : आकाशात उंच भरारी घेण्याचं आणि आकाशाला भिडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. हवाई दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जवळपास 21 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी विमानानं जात असताना हा मोठा अपघात घडला. युक्रेनमध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये साधारण 22 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून दोन जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार युक्रेन इथे एअरफोर्सचं एक विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये सैन्य दलाच्या कॅडरसह 22 जणांचा मृत्यू झाला. हे विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर त्यानं पेट घेतला आणि परिसरात मोठे आगीचे लोळ उठले.
BREAKING: Military plane crashes during training flight in northeast Ukraine pic.twitter.com/09tydqwcah
— BNO News (@BNONews) September 25, 2020
🚨🚨Breaking News 🚨🚨
— DANO (@WakeUp777777) September 25, 2020
Plane crash in Ukraine 👀
https://t.co/3NmFJHlYB2
हे वाचा- ठाण्यात निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मंत्री अँटोन गेराशेन्को यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 22 जणांचा आगीत होरपऴून मृत्यू झाला आहे. दोन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या विमानात होते. 21 विद्यार्थी 7 विमानातील क्रू मेंबर्स असे एकूण 28 जण प्रवास करत होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणी सध्या बचावकार्य सुरू असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना युक्रेन इथे शुक्रवारी घडल्याची माहिती मिळाली आहे. एअरफोर्सचं हे विमान 21 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान धावपट्टीवर लॅण्ड होत असतानाच अपघात घडला आणि विमानानं पेट घेतला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही.

)







