मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Ukraine : युक्रेनियन महिला रशियन सैनिकाशी भिडली, म्हणाली.. तुम्ही आमच्या भूमीवर काय करताय? पाहा व्हिडिओ

Ukraine : युक्रेनियन महिला रशियन सैनिकाशी भिडली, म्हणाली.. तुम्ही आमच्या भूमीवर काय करताय? पाहा व्हिडिओ

Viral Video: रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनच्या एका महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला रशियन सैनिकांना निर्भय होऊन भिडताना दिसत आहे.

  • Published by:  Rahul Punde
कीव, 25 फेब्रुवारी : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून तेथील परिस्थिती बिकट आहे. आज तिसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या काळात युक्रेनमधील नागरिकांशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर येत आहेत जे हादरवून सोडत आहेत. आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक युक्रेनची महिला शस्त्रधारी रशियन सैनिकाशी भिडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती महिला सैनिकाला म्हणताना दिसत आहे की, तू आमच्या जमिनीवर का आला आहेस? ही महिला निर्भय होऊन रशियन सैनिकांशी भिडताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. युक्रेनियन महिलेची निर्भयता युक्रेन वर्ल्ड न्यूज आउटलेटने हा व्हिडिओ शेअर केला असून ती महिला रशियन सैनिकाला म्हणते, “तू बंदुकांसह आमच्या भूमीवर काय करत आहेस? महिलेने रशियन सैनिकाला सूर्यफुलाच्या बिया खिशात ठेवण्यास सांगितले आणि सांगितले की तुमच्या मातीतूनही फक्त सूर्यफूल उगवेल. या व्हिडिओमध्ये युक्रेनची महिला रशियन सैनिकांशी निर्भय होऊन लढताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. तिसऱ्या दिवशीही युद्ध सुरूच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनची राजधानी कीव हे रशियन सैन्याने लक्ष्य केले आहे. शनिवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीवच्या आसपास रशियन हल्ला सुरूच आहे, ज्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये गोळीबाराचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. राजधानी कीवच्या आसपास भीषण गोळीबार सुरू असून लढाऊ विमानांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येत आहेत. रस्त्यांवर सगळीकडे शांतता आहे. दरम्यान, युक्रेनचे सैन्यही निकराने लढाई लढताना दिसत आहेत.
First published:

Tags: Russia Ukraine, Ukraine news

पुढील बातम्या