मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मृत्यूचा सेल्फी! एक क्लिक आणि धडावेगळं झालं शीर; सेल्फीच्या नादात तरुणाचा दुर्दैवी अंत

मृत्यूचा सेल्फी! एक क्लिक आणि धडावेगळं झालं शीर; सेल्फीच्या नादात तरुणाचा दुर्दैवी अंत

X
प्रतीकात्मक

प्रतीकात्मक फोटो

सेल्फी घेताना एका तरुणासोबत भयंकर दुर्घटना घडली आणि त्याचा जीव गेला.

एथेन्स, 28 जुलै : सेल्फी घेणं म्हणजे एक ट्रेंडच झाला आहे. लोक उठता-बसता, खाता-पिताही सेल्फी घेताना दिसतात. कुठे फिरायला गेलो की मग सेल्फी घेण्याचा मोह नक्कीच कुणालाही आवरणार नाही. पण हाच सेल्फी काही लोकांच्या जीवावरही बेतला आहे. असाच सेल्फीमुळे जीव गमावलेल्या तरुणाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तरुण सेल्फी घ्यायला गेला आणि त्याचं शीर धडावेगळं झालं आहे. सेल्फी घेताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यूकेतील 22 वर्षांचा जॅक फेंटन आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत ग्रीसला सुट्ट्या एन्जॉय करायला गेला होता. जॅक हा श्रीमंत कुटुंबातील त्यामुळे ते लोक प्रायव्हेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. तो मित्रांसोबत एका हेलिकॉप्टरमध्ये होता आणि त्याचे पालक मागून दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून येत होते.

ग्रीसची राजधानी एथेन्सजवळ एका प्रायव्हेट हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं. जॅक आधी खाली उतरला आणि त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मागे जाऊन सेल्फी घेत होता. त्याने सेल्फी घ्यायला क्लिक केलं आणि त्याचवेळी त्याचं शीर धडावेगळं झालं.

हे वाचा - बाईक्स घसरताच वरून कोसळली कार, 'मौत का कुआं'मध्ये चिरडले बाईकर्स; अपघाताचा थरारक LIVE VIDEO

जॅक जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरला आणि सेल्फी घेत होता, तेव्हा हेलिकॉप्टरचा पंखा चालू होता.  याच हेलिकॉप्टरच्या पंख्यात त्याची मान कापली गेली. तात्काळ आपात्कालीन टीमला बोलावण्यात आलं, पण पंख्याचा वेग इतका होता की त्याचं डोकं शरीरापासून वेगळं झालं होतं, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

माहितीनुसार बेल 407 हेलिकॉप्टरचं इंजिन बंद होण्याआधीच जॅक हेलिकॉप्टरमधून खाली उतरला होता. त्याचा हा निष्काळजीपणाच त्याच्या मृत्यूचं मोठं कारण ठरला.

हे वाचा - ऐन प्रवासात संपलं विमानातलं इंधन; पायलट-क्रू सह प्रवाशांना फुटला घाम, पुढे काय झालं?

दरम्यान या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पायलटवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पायलटने जर इंजिन आणि पंखा बंद होण्याआधीच प्रवाशांना हेलिकॉप्टरमधून खाली उतरण्याचे आदेश दिले असतील, तर पायलटवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पायलटने जर पंख्याचं बटण दाबून ते बंद केले नसतील तरी इंजिन बंद केल्यानंतर पंखे आपोआप दोन मिनिटांनी बंद होतात.

First published:

Tags: Death, Selfie, World news