मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मोठी बातमी: Abu Dhabi विमानतळ परिसरात Drone हल्ला, दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

मोठी बातमी: Abu Dhabi विमानतळ परिसरात Drone हल्ला, दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

अबुधाबी विमानतळाचा परिसर ड्रोन हल्ल्यांनी हादरला आहे. यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकानं आपला जीव गमावला आहे.

अबुधाबी विमानतळाचा परिसर ड्रोन हल्ल्यांनी हादरला आहे. यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकानं आपला जीव गमावला आहे.

अबुधाबी विमानतळाचा परिसर ड्रोन हल्ल्यांनी हादरला आहे. यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकानं आपला जीव गमावला आहे.

अबुधाबी, 17 जानेवारी: अबुधाबी विमानतळ (Abu Dhabi Airport) परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये (Drone Attack) एकूण तिघांचा मृत्यू (Three Dead) झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी दोघे भारतीय (Two Indians) नागरिक तर एक पाकिस्तानी नागरिक (1 Pakistani national) असल्याची माहिती आहे. विमानतळ परिसरात ड्रोन हल्ला झाल्यानंतर जोरदार स्फोट झाले आणि यात तिघांचा मृत्यू झाला, तर अऩेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे विमानतळावर गोंधळ उडाला असून जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे.

हल्ल्यानंतर झाला स्फोट

अबुधाबी विमानतळ परिसरात अचानक ड्रोनचे हल्ले करण्यात आले. यातील काही ड्रोन हे तेलानं भरलेल्या टँकरवर जाऊन पडले. त्यामुळे टँकरचा स्फोट होऊन या हल्ल्यांची भीषणता अधिकच वाढली. या हल्ल्यात आतापर्यंत सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दोन वेगवेगळे हल्ले

अबु धाबी विमानतळाच्या नव्या धावपट्टीचं काम सुरू असणाऱ्या परिसरात एक ड्रोन हल्ला झाला. हे विमानतळ अद्याप कार्यरत नसल्याने तिथे फारशी हानी झाल्याचं वृत्त नाही. हा परिसर रिकामा होता आणि तिथलं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळे त्या परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. दुसरा स्फोट हा ऑईलचे टँकर उभे असणाऱ्या भागात झाला आणि त्यामुळे टँकरनी पेट घेतला. तेलाच्या टँकरचे जोरदार स्फोट झाल्यामुळे परिस्थितीचं गांभिर्य अधिकच वाढलं.

येमेनमधील उग्रवाद्यांनी घेतली जबाबदारी

हा हल्ला आपणच घडवून आणल्याचं येमेनमधील उग्रवादी गट असणाऱ्या Houthi या संघटनेनं म्हटलं आहे. युएई आणि येमेन यांच्यात 2015 पासून संघर्ष सुरू असून ही त्याचीच परिणती असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Drone shooting, Two dead, UAE