कॅलिफोर्निया, 24 जुलै : एलन मस्कने ट्विटरचे नाव आणि लोगो देन्ही बदलले आहेत. आता ट्विटर कंपनीचे नाव X असणार आहे. तर ट्विटर ओपन करण्यासाठी x.com असा वेब एड्रेस टाकावा लागेल. दरम्यान, एलन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे. मुख्यालयाच्या इमारतीवर लाइटमध्ये x असं दाखवण्यात आलं आहे. याचा फोटो कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनीही पोस्ट केला आहे. याआधी एलन मस्कने सकाळीच प्रोफाइल फोटो बदलला होता. मस्क यांच्यासह ट्विटरचे इतर अधिकृत हँडल्सचे प्रोफाइल पिक्चरही अपडेट केले आहेत. एलन मस्क यांना एका ट्विटर युजरने विचारलं की, ट्विटरचं नाव X असं केल्यानंतर ट्विट्स शब्दाचा वापर केला जाणार का? प्रत्युत्तरादाखल मस्क यांनी सांगितलं की, आम्ही पोस्टला An X अशा नावाने संबोधू. इथे लाखो-करोडोमध्ये सॅलरी; अतिशय निसर्गरम्य ठिकाण, तरी नोकरीसाठी कोणीच येईना, कारण.. ट्विटरला मस्क यांनी गेल्या वर्षी 44 बिलियन डॉलरमध्ये खरेदी केलं होतं. यानंतर आतापर्यंत ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. ट्विटरमध्ये होणारे बदल आणि मस्क यांच्या व्यवस्थापनामुळे अनेक एडव्हर्टायजर्सनी हा प्लॅटफॉर्म सोडला होता. यामुळे कंपनीला मोठा फटकाही बसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.