जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अखेर 54 दिवसांनी बाळाला मिळाली आईची माया, भूकंपानतंर 128 तास होतं ढिगाऱ्याखाली

अखेर 54 दिवसांनी बाळाला मिळाली आईची माया, भूकंपानतंर 128 तास होतं ढिगाऱ्याखाली

अखेर 54 दिवसांनी बाळाला मिळाली आईची माया, भूकंपानतंर 128 तास होतं ढिगाऱ्याखाली

तुर्कीत ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपात ५० हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या भूकंपातून दोन महिन्यांचं बाळ ६ दिवसांनी ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अंकारा, 04 एप्रिल : तुर्कीतील भूकंपाला आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. मात्र तब्बल सहा दिवस ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर निघालेल्या दोन महिन्याच्या मुलाची चर्चा झाली होती. सोशल मीडियावर याला चमत्कार असंही म्हटलं गेलं. तेव्हा भूकंपात मुलाची आई दगावल्याचं म्हटलं जात होतं. पण आता त्याची आई जिवंत असल्याचं आणि दोघेही पुन्हा भेटल्याचं समोर आलं. डीएनए टेस्टनंतर भूकंपात वाचल्यानंतर उपचार सुरू असलेल्या महिलेचं हे बाळ असल्याचं स्पष्ट झालंय. युक्रेनच्या मंत्र्यांचे सल्लागार एंटोन गेराशचेंको यांनी मुलाचे फोटो शेअर करत बाळाला त्याची आई भेटल्याच सांगितलं. तुर्कीतील स्थानिक न्यूज वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, लहान बाळाच्या आईवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ५४ दिवसांनी आणि डीएनए टेस्टनंतर आता बाळ आणि आई एकत्र आले आहेत.

जाहिरात

मंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं की, तुर्कीत भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली दोन महिन्यांचं बाळ तब्बल १२८ तास होतं. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. बाळाच्या आईचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं होतं. पण आता आई जिवंत असल्याचं समजतंय. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ५४ दिवसांनी अखेर दोघेही एकत्र आहेत. बाळाची आणि आईची भेट झाल्यानंतर ट्विटरवर एका युजरने म्हटलं की, हे खूपच चांगलं आहे. दोघेही सुखरुप आहेत आणि एकमेकांसोबत आहेत हे पाहून बरं वाटलं. तुर्कीत ६ फेब्रुवारी रोजी विध्वंसक भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात तुर्कीत ५० हजारहून अधिक मृत्यू झाले. तर सिरियात ७ हजार जणांचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात