नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : आपल्या पतीच्या वागणुकीमुळे नाराज महिलेने त्याचा विकून टाकण्याचाच निर्णय घेतला. यासाठी महिलेने पद्धतशीरपणे एक जाहिरातच काढली. विशेष म्हणजे पतीला विकल्यानंतर रिटर्न पॉलिसी नसल्याचं सर्वात आधीच सांगितलं. ही घटना आयरलँड येथून समोर आली आहे.
एका आयरिश महिलेने आपल्या पतीला एका ऑनलाइन साइटवर विकण्यासाठी जाहिरात दिली. पतीच्या एका कृत्यामुळे नाराज महिलेने त्याला विकण्याची जाहिरात काढली. मजा म्हणजे पतीला विकण्यासाठी ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या महिलेने रिटर्न पॉलिसी ठेवली नाही. बिचाऱ्या पतीकडून एकच चूक झाली होती. मासे पकडण्यासाठी गेला असताना तो सोबत पत्नीला घेऊन गेला नाही. त्याने पत्नीला आणि मुलांना घरीच सोडलं होतं.
न्यूजीलँडमध्ये ट्रेडमी साइटवर दिलेल्या जाहिरातीत महिलेने चांगली डिल मिळविण्यासाठी पतीचे फायदे आणि नुकसान याबद्दलही सांगितलं. लिंडा मॅकएलिस्टर नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिलेने आपल्या जाहिरातीत असा उल्लेख केला आहे की, तिचा पती 37 वर्षीय आहे. त्याची उंची 6 फूट 1 इंच आहे.
हे ही वाचा-हृदयद्रावक! 7 दिवसांची चिमुकली बर्फ बनली; बापाच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यूपतीच्या कृत्यामुळे महिला नाराज...
या दाम्पत्याने 2019 मध्ये आयरलँडमध्ये लग्न केलं होतं. आणि सध्या ते आपल्या दोन मुलांसह न्यूजीलँडमध्ये राहत आहे. शाळेच्या सुट्टीदरम्यान जॉन मासे पकडण्यासाठी गेला होता आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी पत्नीला घरात सोडून गेला. पतीच्या कृत्यामुळे नाराज महिलेने आपल्या पतीला विकण्याचा निर्णय घेतला.
पत्नीने सांगितलं पतीचे कौशल्य..
रिपोर्ट्सनुसार, महिलेने जाहिरातीत लिहिलं की, तो कायम प्रमाणिक राहील. हा मात्र त्याला नीट देवू-खाऊ द्यावं लागेल. आपल्या पतीच्या कौशल्याबद्दल सांगताना महिला म्हणाला, त्याला शूटिंग आणि फिशिंग आवडते. तो चांगली शेतीही करतो. तो खूप चांगला आहे. नव्या ठिकाणी तो अस्वस्थ होतो, मात्र काही वेळानंतर तो एन्जाॅय करू लागतो. शेवटी महिलेने एक अट ठेवली, त्यानुसार विकल्यानंतर रिटर्न पॉलिसी नसेल. म्हणजे विकलेला माल परत घेतला जाणार नाही.
12 महिलांनी खरेदी करण्यात दाखवला इंट्रेस्ट...
विक्रीसाठी लावलेला पती तेव्हा चर्चेचा विषय होता. जाहिरात अनेक महिलांनी गांभीर्याने घेतली आणि 12 महिलांनी खरेदी करण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं. मात्र जशी बोली सुरू झाली, त्याच्या काही तासात ही जाहिरात हटवण्यात आली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.